Ganesh Chaturthi Weekend Travel Tips: आई देव बाप्पा येतोय...! यंदा गणेश चतुर्थी हा सण ७ सप्टेंबरला (शनिवार) साजारा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीच्या दिवशी 'गणेश चतुर्थी' साजरी केली जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही बोलले जाते.
गणेश चतुर्थीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेश पूजनाने केली जाते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू केल्यास ते काम सुरळीतपणे पूर्ण होते असे मानले जाते.
दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यंदा शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्या लागून आल्या आहेत. यामुळे अनेक लोक फिरायला जाण्याचा विचार करत असतील. पण घराबाहेर पडण्यापुर्वी पुढील ट्रॅव्हल टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे गणेशोत्सावाचा आणि सहलीचा आनंद द्विगुणित होईल.