Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाची आरास एकदम झकास! पैठणी,खण अन् प्लेन साडी वापरून करा बाप्पाची आरास

Saree Decoration Ideas For Ganpati Bappa : सध्या पैठणी, खण, प्लेन अन् डिझाईनर साड्या वापरून सजावट केली जात आहे. तुम्हालाही अशा पद्धतीची सजावट कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर चला पाहुयात.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2024 :

गणपती बाप्पाची आरास करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. पडदे, फुले, फुगे, लाईट्स यांचा वापर आपण अनेक वेळा केला आहे. तुम्ही बाप्पाचे मकर सजवण्यासाठी कधी साडीचा वापर केलाय का?  

गणपती बाप्पासाठी सजावट करताना नेहमी ट्रेंडचा विचार केला जातो. काही लोक देखावे साकारतात. वारकरी,शेतकरी थाटात बाप्पा विराजमान झालेला असतो. तुम्हाला असे देखावे साकारायला वेळ नसेल तरी तुम्ही सोप्पा पद्धतीने सजावट करू शकता.     

सध्या पैठणी, खण, प्लेन अन् डिझाईनर साड्या वापरून सजावट केली जात आहे. तुम्हालाही अशा पद्धतीची सजावट कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर चला पाहुयात.

पैठणीचे मखर

सध्या गणपती बाप्पाचे पैठणी साडीतले मखर ट्रेंडमध्ये आहेत. पैठणी साडीच्या कापडापासून बनवलेले तोरण, आसन, गादी आणि लोड, बाप्पांच्या मागील बाजूला पडदा तोही पैठणी कापडाचाच. असे हे ट्रेनमध्ये आहे. (Saree Decoration Ideas For Ganpati Bappa)

पैठणीपासून बनवलेली गणपती सजावट
पैठणीपासून बनवलेली गणपती सजावट esakal
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 : कोल्हापुरी फेटा अन् पेशवाई पगडीत खुलून दिसेल तुमचा गणपती बाप्पा, या सोप्या पद्धतीने घरीच बनवा फेटा

साडीचा पडदा

तुम्ही अनेक प्रकारे गणपती बाप्पाच्या आरास सजवण्यासाठी साड्यांचा वापर करू शकता. तुम्ही साडीचा पडदा म्हणून वापर करू शकता. बापाचा सजावट करण्यासाठी तुम्ही पडद्यांचा वापर करणार असाल तर त्या पडद्याने ऐवजी तुम्ही गडद रंगाच्या काठपदर साड्यांचा वापर करू शकता. यामुळे बाप्पाची मूर्ती उठून दिसेल.

बाप्पाचे मखर सजवा

कोकणात मोठ्या आकाराची गणपती बाप्पांची मूर्ती असते. त्यामुळे त्यांना संपूर्ण घराला सजवावं लागतं. तुम्हीही संपूर्ण घरभर पताके, फुले लावणार असाल तर वेगवेगळ्या रंगांच्या साड्या एकासोबत एक लावू शकता. जिथे बाप्पाला बसवणार तेथील मागील भिंत विविध रंगांच्या साड्यांनी झाकून टाका.

साडी आणि फुले

बाप्पाच्या सजावटीसाठी तुम्ही साडीचा वापर करणार असाल तर ही आरास बेस्ट आहे. तुम्ही बाप्पाचा टेबल सजवून घ्या. आणि मागील बाजूस साडीचा पडदा लावू शकता. आणि उर्वरीत बाजूला फुलांच्या सुंदर माळा लावू शकता.

घरातच उभारा मंडप

गणेश मंडळांचा गणपती बाप्पा मोठ्या मंडपात बसलेला असतो. घरातही पाईप्स आणि काठ्यांच्या मदतीने सभामंडप उभारू शकता. यासाठी पाईप्स एकमेकांना जोडून तुम्ही आधी सेट तयार करा. आणि नंतर त्यावर वेगवेगळ्या साड्या टाकून पिनअप करा. ज्यामुळे तुम्हाला सभामंडपातील बाप्पाचा देखावा करता येईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.