Pune Ganpati Festival: गणपती बाप्पा मोरया.. जयघोषात ७ सप्टेंबरला बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात घराघरात आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तीमय आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे.
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनानेच होते. मान्यतेनुसार श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू केल्यास ते काम सुरळीतपणे पूर्ण होते.
या काळात गणपतीची बाप्पाची मूर्ती घरी आणून मनोभावे पूजा केली जाते. विघ्नहर्ताला मोदक, लाडू, लाल फुलं आणि दुर्वा प्रिय आहे. बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्यास प्रसन्न होतात.
महाराष्ट्रासह देशभरात दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. गणपती पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येथे येतात.
पुण्यातील गणपती बघायला कुठे आणि कधी जावे असे प्रश्न तुम्हाला पडले असेल तर या प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला सांगणार आहोत.