सर्वांच्याच घरी गणपती बाप्पासाठी चांदी अन् सोन्याचे दागिने, मखर, नैवेद्य अशी सर्व तयारी झाली असेल. चारच दिवसात बाप्पा घरी येणार आहे. त्यामुळे सर्वत्र साफसफाई आणि सजावटीची गडबड सुरू आहे.
बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करण्यात महिला वर्ग गुंतला आहे. बाप्पासाठी शेला,मोत्यांचा हार आणला असेल. पण एक गोष्ट तुम्ही विसरताय. बाप्पासाठी फेटा आणलात का? बाप्पांची मनमोहक मूर्ती फेटा घातल्यानंतर अधिक रूबाबदार दिसेल.
तुम्हालाही बाप्पासाठी फेटा हवा असेल तर तो विकत आणू नका. काही किरकोळ वस्तू वापरून तुम्ही स्वत:चा बाप्पासाठी फेटा आणि मुकूट बनवू शकता. बाप्पासाठीचा मुकूट कसा बनवायाचा हे पाहुयात.
गणपती बाप्पाला फेटा बनवण्यासाठी तुम्हाला केशरी किंवा गुलाबी रंगाचे कापड, जाड कार्डशिट, कात्री, फेविकॉल मनी आणि ब्रोच अशा वस्तू लागतील. फेटा बनवण्यासाठी जरी काठ असलेले कापड घ्या. दुकानांमध्ये तुम्हाला एक मीटर प्रमाणात हे कापड सहज मिळेल. फेटा कसा बनवायचा हे पाहूया.
आजकाल वेगवेगळ्या आकारातील फेटे बाप्पासाठी बनवले जातात. त्यामध्ये गणपती बाप्पाला मावळा पगडी घालण्याचा सुद्धा ट्रेंड आहे. तुम्हालाही तुमच्या बापाला मावळा पगडी बनवायची असेल तर त्यासाठी काही जाड कार्डशिट, रंग, फेविकॉल आणि लाल रंगाचे कापड लागेल. यावर तुम्ही आकर्षक रंगाची लेसही लावू शकता. बाप्पासाठी मावळा पगडी कशी बनवायची हे पाहुयात.
नुकत्याच झालेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही अशापद्धतीच्या पगडी पाहिल्या असतील. शाळेत जाणारे बालचमू आणि दहीहंडी फोडणाऱ्या बालगोपालांनीही अशी पगडी परिधान केली होती. तुम्ही अशी अगदी क्युट दिसणारी, ज्यात मोरपिस अन् फुलांचीही सजावट केली जाते. अशी श्री कृष्ण पगडी बाप्पासाठी कशी बनवायची हे पाहुयात.
यासाठी तुम्हीला मोरपिस,रंगीत कापड, फुले आणि मोत्याच्या छोट्या माळाही लागतील. चला पाहुयात पगडी कशी बनवायची.
आजकाल नवरदेवाच्या पोशाखातही पेशवाई रुबाब उतरला आहे. नवरदेवाच्या डोक्यावरती फेटा नाही तर पेशवाई पगडी दिसून येते. त्यांचा पोशाख हे तसाच असतो. गणपती बाप्पा साठी तुम्हाला जर पेशवाई पगडी घालायची असेल तर ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहुयात.
गणपती बाप्पासाठी सोन्यासारखा दिसणारा मुकूट तुम्ही घरीही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला जाड कार्डशिट पेपर, सोनेरी कागद, लेस, मणी, ब्रोच लावता येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.