Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहेत. बाजारात गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असून, गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारखान्यात कारागीर मूर्तीवर अखेरचा हात फिरविताना दिसत आहेत. यात महिला कारागिरांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यंदा गणेशोत्सवात किमती वाढल्याने अनेकांकडून छोट्या मूर्तींना पसंती दिली जात आहे. अनेकांनी आतापासूनच मूर्तीची आगाऊ नोंदणीस सुरुवात केली आहे. मूर्तीच्या दरांत वाढ झाल्याने भक्तांवर आर्थिक भार पडणार आहे. (Small idols are favored as prices rise final touch on Ganesh idol )