Ganesh Chaturthi 2024 : फुले,माळा,पडदे आणि बरंच काही, गणपती डेकोरेशनचे साहित्य पुण्यात सर्वात स्वस्तात कुठे मिळेल?

Ganpati Bappa Decoration Wholesale Market : इथे पूजेसाठी लागणारे साहित्य, गणपतीचे दागिने, फेटा, गौराईसाठीच्या साड्या मुकुट स्टॅन्ड अशा गोष्टीही स्वस्तात मिळत आहेत.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 esakal
Updated on

Ganpati Bappa Decoration Wholesale Market :

सर्वांचे लाडके गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत. त्यामुळे गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या थीम ठरवल्या जात आहेत. तर गणपतीसाठी सजावटीसाठी फुले, माळा, हार, वेली, आर्टिफिशियल फोम शीट कमी किमतीत कुठे मिळेल यासाठी बाजारपेठा शोधल्या जात आहेत.

जर तुम्ही पुण्याचे रहिवासी असाल तर पुण्यात काही मार्केट अशी आहेत जिथे तुम्हाला गणपती सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळणार आहे. केवळ सजावटीचे नाही तर पूजेसाठी लागणारे साहित्य, गणपतीचे दागिने, फेटा, गौराईसाठीच्या साड्या मुकुट स्टॅन्ड अशा गोष्टीही स्वस्तात मिळत आहेत.

पुण्यातील लोकांनी या बाजारपेठांना नक्कीच भेट दिली असेल. पण जर तुम्ही कामानिमित्त पुण्याला जात असाल तर या होलसेल दुकानांना नक्की भेट द्या. (Ganpati Bappa Decoration Ideas)

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला वाढवा तुमचाही रूबाब; तरूणांसाठी बेस्ट आहेत 'हे' आऊटफीट्स, दिसाल एकदम झक्कास..!

शुक्रवार पेठ

शुक्रवार पेठमधील होलसेल मार्केटमध्ये तोरण,फुलांच्या माळा, आर्टिफिशिअल फुले, बाप्पांच्या मागे लावण्यासाठी ग्रीन जाळी अशा वस्तू कमी दरात उपलब्ध आहेत. येथे असलेले दुकानांमध्ये फुलांच्या माळा ५० रूपयांना ५ तर १२०,४५० ला दहा फुलांच्या माळा मिळतात.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 : मैत्रिणींनो, घरही सांभाळा अन् आवडही जपा! गणेशोत्सवाच्या सिझनमध्ये हे छोटे बिझनेस करून कमवा पैसे

रविवार पेठ

पुण्यातल्या रविवार पेठेत असलेल्या दर्ग्याच्या समोर असलेल्या गल्लीत गणपतीच्या सजावटीसाठीचे साहित्य उपलब्ध आहेत. या गल्लीत सर्वत्र सजावटीचे साहित्य विक्री करणारे लोक तुम्हाला दिसू शकतात. काहींनी रस्त्यावर स्टॉल मांडले आहेत. तर, काही लोक दूकानातूनच होलसेल, रिटेल विक्री करत आहेत.

इथे तुम्हाला फुले,माळा, सजावटीच्या इतर वस्तू, फोम,शीट, फुले लावण्यासाठीचे लाकडी स्टॅंड कमी किंमतीत मिळेल. दरवर्षी आपण नवे सामान खरेदी करत नाही. पण, काही नवं बाजारात आलं तर ते नक्की खरेदी करतो. तुम्हालाही जर काही मोजक्या पण सुरेख फुलांची सजावट करू शकता.

लक्ष्मीनारायण मार्केट

पुण्यातील लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये असलेल्या दुकानांमध्ये होलसेल रेटमध्ये तुम्हाला सर्व वस्तू मिळतील. वेगवेगळ्या आकाराच्या फुले, वेली, स्टॅंड, फुलांनी सजवलेल्या फोम शीट यांनी या बाजारपेठा सजल्या आहेत. लक्ष्मी नारायण मार्केटमध्ये फुलं डझनावर तुम्ही खरेदी करू शकता. इथे २० रूपयांपासून ५०० पर्यंत डझन फुले अन् माळा मिळतील.

बोहरी आळी मार्केट

पुण्यातील कसबा पेठ जवळ असलेल्या बोहरी आळी मार्केटमध्येही तुम्हाला गणपती बाप्पाच्या सजावटीचे साहीत्य होलसेल रेटमध्ये मिळेल. विविध आकाराची,रंगाची फुले, वेली, गुच्छ, फ्लॉअर पॉट्समध्ये अनेक व्हरायटी पहायला मिळेल. विशेष म्हणजे या मार्केटला तुम्हाला गणपतीबाप्पासाठी वेलवेलटच्या आसनांची व्हरायटी सुद्धा मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.