टाकाऊ वस्तूंपासून साकारला आकर्षक देखावा, घडविले केरळ संस्कृतीचे दर्शन

नागपुरमधील प्रसिद्ध कलावंत व गणेशभक्त श्रीकांत गडकरी यांनी गणेशोत्सव व महालक्ष्मी पूजनाच्या निमित्त त्यांच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक देखावा बनविला आहे.
Ganesh Festival
Ganesh Festival Sakal
Updated on

नागपुरमधील प्रसिद्ध कलावंत व गणेशभक्त श्रीकांत गडकरी यांनी गणेशोत्सव व महालक्ष्मी पूजनाच्या निमित्त त्यांच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक देखावा बनविला आहे. या माध्यमातून त्यांनी कलेसह केरळच्या संस्कृतीचे हुबेहूब दर्शनही नागपूरकरांना घडविले आहे. ही अनोखी कलाकृती पाहण्यासाठी कलाप्रेमी गर्दी करीत आहेत.

दुर्गानगर माध्यमिक शाळेत कलाशिक्षक असलेले ५४ वर्षीय गडकरी हे दरवर्षी एखादा हलकाफुलका व वेगळा विषय घेऊन आकर्षक कलाकृती साकारतात. यावेळी त्यांनी छोटा ताजबाग परिसरातील सुर्वे ले-आऊट येथील निवासस्थानी १० बाय १२ च्या खोलीत दाक्षिणात्य केरळच्या संस्कृतीवर आधारित आकर्षक, सुंदर व मनमोहक देखावा तयार केला आहे. त्यांनी केळी वगळता कागद, पाईप, खरडे, टिनाचे डबे इत्यादी टाकाऊ वस्तूंचा अधिक वापर केला. कागदापासून बनविलेले केळीचे बन हुबेहूब वाटते. बॅकड्रॉपवर उठून दिसणाऱ्या व ओनम सणाच्या निमित्ताने केली जाणारी वल्लमकली नौका स्पर्धा मुख्य आकर्षण आहे. गडकरी यांना केवळ चार ते पाच हजारांचा खर्च आला असून, परिवारातील इतर सदस्यांच्या मदतीने पंधरा दिवसांत देखावा पूर्ण केला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही विविध विषयांवर देखावे तयार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.