गणेश व त्यांच्या पत्नी मोनिका गाडवे यांनी यावर्षी पंढरीच्या वारीचा देखावा गणेशोत्सवानिमित्त तयार केला आहे.
केळघर : गणेशोत्सव व मराठी माणूस यांचे नाते अनोखे आहे. महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव साजरा करण्याची वेगळी परंपरा आहे. मराठी माणूस जिथे जिते नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक आहे, तिथे तिथे गणेशोत्सव (London Ganeshotsav) उत्साहाने साजरा केला जातो. सातासमुद्रापार असलेल्या गोऱ्या साहेबांच्या इंग्लंड देशाची राजधानी लंडनमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झालेले केळघरचे सुपुत्र गणेश गाडवे यांनीही लंडनमधील आपल्या राहत्या घरात बाप्पांची स्थापना केली आहे.