Ganeshotsav 2022 : पिटूकला उंदीर गणपती बाप्पाचे वाहन कसा झाला? जाणून घ्या

Ganpati Undir story
Ganpati Undir storyesakal
Updated on

प्रत्येक देवतेचा वाहन हा एक प्राणी आहे. याचप्रमाणे गणपती बाप्पाची पुजा करताना त्यांच्या पायाजवळ उंदीर मामा असतात. गणपतीची पुजा केल्यानंतर मोदकांचा प्रसाद जसा गणपतीसाठी असतो त्याचप्रकारे उंदीर मामासाठी करंजीचा नैवेद्यही आपण ठेवतो. गणपती बाप्पासारख्या विशाल देह असणाऱ्या देवतेला उंदरासारख पिटूकल वाहन कस प्राप्त झाल असेल ही मोठी आश्चर्याची कहाणी आहे.

Ganpati Undir story
Ganesh Aarti: तुम्ही सुद्धा 'संकष्टी पावावे' म्हणताय ? वाचा सगळ्या आरत्या योग्य व्याकरणासह

एकदा देवराज इंद्राची सभा भरली असताना गाण गाण्यासाठी क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीने बोलवण केल. देवराज इंद्राचे बोलाविणे आहे म्हटल्यावर हा गंधर्व तातडीने सभेकडे निघाला. घाईघाईने सभेस्थळी पोहचण्याच्या नादात बामदेव नावाच्या महर्षीला क्रौंच गंधर्वाची लात लागली. त्यामुळे महर्षी संतापले आणि त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला कि, तू तुरु तुरु धावणारा उंदीर होशील. महर्षींच्या शापाने क्रौंच गंधर्वाचे उंदरात परिवर्तन झाले. त्या गंधर्वाचा झालेला उंदीर पाराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला. या उंदराने पाराशर ऋषींच्या आश्रमात उच्छाद मांडला. आश्रमातल्या अन्न धान्याची त्याने नासाडी करायला सुरुवात केली. आश्रमातील अन्न धान्याची पोते, ऋषींची वस्त्रे, ग्रथ- पोथ्या अस सर्वकाही त्याने कुरतडून टाकले. त्यामुळे वैतागलेल्या आश्रमातल्या ऋषींनी या उंदराला पकडण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. पण कोणीच त्याला पकडू शकले नाही. हे पाहून पाराशर ऋषींनी गणेशाला प्रार्थना केली.

Ganpati Undir story
Ganeshotsav 2022: गणपती बाप्पा मोरया का म्हटले जाते ? काय आहे या मागचा रंजक इतिहास

गणेशाने आपल्या चतुर बद्धीने पाश टाकून उंदराला पकडले तेव्हा सुटकेसाठी तो उंदीर गयावया करु लागला. तेव्हा गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा उर्मट उंदीर गणपती बाप्पाला गर्विष्टपणे म्हणाला मला तुझ्याकडून काहीही नकोय, याउलट तुच माझ्याकडे वर माग. त्यावर चतुर गणेशाने लगेच सांगितले, ठिक आहे मी तुझ्याकडे वर मागतो. तर तू आजपासून माझे वाहन हो असे म्हणत गणपती बाप्पा टुणूककन त्या उंदरावर स्वार झाले. गणेशाच्या भाराने तो उंदीर दीन झाला. व त्यादिवसापासून तो गणपती बाप्पांचे वाहन झाला अशी कथा आहे.

उंदीर गणपतीचे वाहन कसा झाला याच्या अनेक कथा आहेत. पुढच्या भागात याविषयीची दुसरी कथा आपण जाणू घेवूया.

Ganpati Undir story
Ganeshotsav 2022: बाप्पांची ‘मै झुकेगा नही साला’ स्टाईल पाहिली का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.