तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी, नियमांच्या चौकटीत बसवून शांततेने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
निपाणी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी (Ganeshotsav Mandal) सर्व प्रकारची परवानगी घेऊनच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. गणेशाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करावे. दरवर्षीप्रमाणे यंदाही डीजे, साऊंड सिस्टीमवर बंदी (DJ, Sound System Ban) घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा चिक्कोडीचे पोलिस उपअधीक्षक गोपालकृष्ण गौडर (Gopalkrishna Gowder) यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.