Ganpati Chaturthi 2023 Prasad : शास्त्र प्रसादाचे! पंचखाद्याच्या सेवनामुळे शरीराला होईल पोषणतत्त्वांचा पुरवठा

Ganpati Chaturthi 2023 Prasad : गणपतीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यातील प्रत्येक घटकाचे आपल्या आहारशास्त्रात विशिष्ट महत्त्व आहे.
Ganpati Chaturthi 2023 Panchkhadya
Ganpati Chaturthi 2023 PanchkhadyaSakal
Updated on

- राधिका शहा, आहारतज्ज्ञ, एलओसी

पंचखाद्यामधील पाच पदार्थ म्हणजे खारीक, खोबरे, बदाम, खसखस आणि खडीसाखर याला ‘पंचखाद्य’ असे म्हटले जाते. गणपतीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यातील प्रत्येक घटकाचे आपल्या आहारशास्त्रात विशिष्ट महत्त्व आहे. यामुळेच भारतीय परंपरेमध्ये पंचखाद्याला महत्त्व देण्यात आले आहे.

खारीक

खारीक ही पचनक्रियेसाठी महत्त्वाची असते. त्यात लोह, फायबर आणि कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते. ते शरीरासाठी चांगले पोषक घटक ठरते. 

Ganpati Chaturthi 2023 Panchkhadya
Panchamrut Benefits प्रसादाचे शास्त्र ! पंचामृताचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

खोबरे

खोबऱ्यामध्येही फायबर असते, शिवाय याद्वारे शरीराला चांगल्या मेदाचा (फॅट्स) पुरवठा होतो. 

Ganpati Chaturthi 2023 Panchkhadya
खिलाडी अक्षय फिट राहण्यासाठी करतोय Aqua Exercise, तुम्हीही जाणून घ्या जबरदस्त फायदे

बदाम

बदामामध्ये प्रथिने असतात. तसेच 'ओमेगा 3' आणि 'ओमेगा6', फॅटी अॅसिड हे घटकही असतात. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात. शरीरातील नसांच्या आरोग्यासाठी बदामाचे सेवन करणं उपयुक्तच ठरते.

Ganpati Chaturthi 2023 Panchkhadya
Febrile Seizure Symptoms 'फिट्स'ची समस्या लहान मुलांमध्येही, पालकांनो याकडे दुर्लक्ष करू नका

मेंदूतील पेशींच्या पोषणासाठीही हे महत्त्वाचे असते. बदामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात व्हिटॅमिन ई असते. जे अँटी ऑक्सिडंट्स म्हणून कार्य करते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. शरीरातील पेशींची ताकद वाढते. 

खसखस

खसखसमध्ये मॅग्नेशिअम हे पोषक घटक असते. हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे प्रभावी ठरते. 

खडीसाखर

खडीसाखरेचे महत्त्व आयुर्वेदामध्येही अधोरेखित केले आहे. खोकल्याची ढास थांबवण्यासाठी खडीसाखर खाण्याचा सल्ला आजही दिला जातो. थंडी, ताप यापासून मुक्तता मिळवण्यासाठीही याचा वापर केला जातो.

मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पंचखाद्य हे सर्वोत्तम मिश्रण आहे. यामुळे गणपतीच्या प्रसादाच्या रूपात याचे सेवन करून मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्यात निश्चित मदत मिळू शकते.

मधुमेहींनी घ्यावी ही काळजी

अर्थात खडीसाखरेमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी पंचखाद्यात खडीसाखरेऐवजी बेदाणे किंवा अक्रोड मिक्स केल्यास पोषणमूल्य वाढते. याद्वारे शरीराला ऊर्जा देणारे पंचखाद्य तयार करता येते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.