Ganesh Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकीत 'ही' घ्या काळजी, 'महावितरण'कडून गणेश मंडळांना आवाहन

महावितरणने स्थानिक प्रशासन व पोलिसांशी समन्वय साधून मिरवणूक मार्गावर दक्षता घेतली आहे.
Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur
Ganpati Visarjan Miravnuk Kolhapuresakal
Updated on
Summary

महावितरणकडून मिरवणूक मार्गावर व विसर्जन ठिकाणी सुरक्षेसाठी जादा मनुष्यबळ तैनात केले आहे.

कोल्हापूर : महावितरणकडून गणेशोत्सव (Kolhapur Ganeshotsav) काळात वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी काळजी घेण्यात आली आहे. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी (Ganesh Mandal) विद्युत साधने व यंत्रापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने स्थानिक प्रशासन व पोलिसांशी समन्वय साधून मिरवणूक मार्गावर दक्षता घेतली आहे. विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर), विद्युत खांबास ताण दिलेली तार, भूमिगत वाहिनींचे फिडर पिलर आदींपासून सुरक्षित अंतर राखावे.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur
Sangli Ganeshotsav : सांगलीत DJ च्या दणदणाटाने दोन तरुणांचा मृत्यू; पोलिस यंत्रणेने कानात बोळे घातलेत का?

तसेच गणेशभक्त व कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिडर पिलर आदींवर चढू नये. लोखंडी अथवा धातूच्या रॉडच्या झेंड्यांचा, वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मिरवणुकीसाठी विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून विजेचा वापर करू नये.

Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur
Konkan Ganeshotsav : भजनानंतर गावाकडं परतताना काळाचा घाला; दुचाकीवर झाड कोसळून सख्खे चुलत भाऊ ठार

महावितरणकडून मिरवणूक मार्गावर व विसर्जन ठिकाणी सुरक्षेसाठी जादा मनुष्यबळ तैनात केले आहे. मंडळ कार्यकर्त्यांनी आपत्कालीन स्थितीत महावितरणच्या जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी (७८७५७६९१०३) (७८७५७६९१०३) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()