Sangli Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचा भंग; 75 गणेश मंडळांवर पोलिसांची कारवाई, 3 हजार पोलिस तैनात

अनंत चतुर्दशीदिवशी देखील पोलिसांची ध्वनितीव्रतेवर नजर असणार आहे.
Sangli Ganpati Visarjan Miravnuk
Sangli Ganpati Visarjan Miravnukesakal
Updated on
Summary

६५ डेसिबलहून कमी ध्वनिमर्यादा ठेवणाऱ्या मंडळांची संख्या ४९ आहे.

सांगली : अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात तैनात आहेत. विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

आतापर्यंत ७५ मंडळांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियम व पर्यावरण संरक्षणान्वये कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. विसर्जनावेळी (Sangli Ganeshotsav) कायदा-सुव्यवस्थेस कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गासह अन्य प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Sangli Ganpati Visarjan Miravnuk
Sangli Ganeshotsav : सांगलीत DJ च्या दणदणाटाने दोन तरुणांचा मृत्यू; पोलिस यंत्रणेने कानात बोळे घातलेत का?

सात उपाधीक्षक, २२ निरीक्षक, १३१ सहायक निरीक्षक, १६०७ अंमलदार, ९५० गृहरक्षक दलाचे जवान, एसआरपीएफच्या २ प्लाटून आणि १४ स्ट्रायकिंगची पथके मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. मिरजेत विसर्जन मिरवणूक मोठी असल्याने तेथे ४ उपाधीक्षक, १२ निरीक्षक, ६१ सहायक निरीक्षक, ५६८ अंमलदार, ७५ वाहतूक अंमलदार, २११ गृहरक्षक जवान, एसआरपीएफची १ प्लाटून आणि ४ स्ट्रायकिंगचे पथकाचा समावेश बंदोबस्तात करण्यात आला आहे.

Sangli Ganpati Visarjan Miravnuk
Kolhapur Ganpati Visarjan : विषयच हार्ड! मिरवणुकीत अवतरणार 'चांद्रयान, सूर्ययान'; पारंपरिक वाद्यांसह मल्टिकलर शार्पींनी उजळणार आसमंत

उत्सव कालावधीत ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोर करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात ध्वनिमापक यंत्रे उपलब्ध करून देण्यात आलीत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय एक अधिकारी व अंमलदार अशा पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२५ गणेश मंडळांची मिरवणुकीत ध्वनितीव्रता तपासण्यात आली. ६५ डेसिबलहून कमी ध्वनिमर्यादा ठेवणाऱ्या मंडळांची संख्या ४९ आहे.

Sangli Ganpati Visarjan Miravnuk
Ganpati Visarjan : मिरवणुकीत 'लेझर शो'चे Video Recording करत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा पडू शकतं महागात!

७६ मंडळांनी उल्लंघन केल्याचे समोर आले. अनंत चतुर्दशीदिवशी देखील पोलिसांची ध्वनितीव्रतेवर नजर असणार आहे. समाजमाध्यमांवर कोणीही आक्षेपार्ह मजकूर शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले असून सायबर शाखेची नजर राहणार आहे. मिरवणुकीतील गर्दी लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील दोन अधिकारी व २० अंमलदारांची दोन पथके साध्या वेशात तैनात असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.