Gauri- Ganpati 2024: सोनपावलांनी आल्या गौराई, धूपदिव्यांचा साज, फुलांची दरवळ, फराळ, सुंदर आरास

Gauri- Ganpati 2024: भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मी म्हणजे गौराईचे आगमन झाले. नित्योपचार आटोपल्यावर महालक्ष्मीचे आवाहन झाले. परंपरेनुसार कुठे दुपारी तर कुठे सायंकाळपर्यंत महालक्ष्मी बसवण्यात आल्या.
Gauri- Ganpati 2024
Gauri- Ganpati 2024Sakal
Updated on

Gauri- Ganpati 2024:

‘नेसला भरजरी, चोळी बदामी ल्याली,

कुरले काजळ, नाकी मोरणी ल्याली,

सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली...’

अत्तर, धूपदिव्यांचा साज, फुलांची दरवळ, फराळ, एकाहून एक सुंदर आरास ठेवून ज्येष्ठा-कनिष्ठांचे मंगळवारी सोनपावलांनी आगमन झाले. देखणी मांडणी, उत्तम सजावट करून शहरवासीयांनी महालक्ष्मीचे विधिपूर्वक स्वागत केले. परंपरा आणि नावीन्यपूर्ण वातावरणात घरोघरी चैतन्य, मांगल्य आणि पावित्र्याचा प्रवेश झाल्यासारखे सर्वत्र मंगलमय वातावरण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.