गौरव देशपांडे, पंचांगकर्ते
गणेश उपासनेमध्ये ‘चतुर्थी’ या तिथीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना गणेशाची सर्व व्रते ही चतुर्थी तिथीलाच असल्याचे आपल्याला आढळून येईल. असे का?
त्यासाठी ‘चतुर्थी‘ म्हणजे नक्की काय ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अमावास्येनंतर चंद्राची एकेक कला वाढते व पौर्णिमेला संपूर्ण कलांनी युक्त असे चंद्रबिंब दिसते. पौर्णिमेनंतर चंद्राची एकेक कला कमी होत जाते व अमावस्येला चंद्रबिंब दृश्यमान होत नाही. या चंद्रकलेलाच ‘तिथी’ असे म्हणतात.
मुहूर्त चिंतामणी ग्रंथात -
तिथीशा वह्निकौ गौरी गणेशोऽहिर्गुहो रविः ।
शिवो दुर्गान्तको विश्वे हरिः कामः शिवः शशी ।।