Gauri-Ganpati 2024: गणेशाचे आगमन झाल्यानंतर गौरीच्या (महालक्ष्मी) उत्सव साजरा करण्यासाठी पैठण शहरात मंगळवारी घरोघरी गौराईची स्थापना महिला भगिनींनी केली. आवाहन, पूजन आणि विसर्जन असे तीन दिवस चालणाऱ्या उत्सवाला सर्वत्र विशेषतः ग्रामीण भागात मोठे महत्त्व आहे. काळानुरूप या उत्सवाचे स्वरूप बदलत असले तरी भावभक्ती, उत्साह पैठण शहरात पाहायला मिळाला. महिला भगिनींनी. गौरी सजावट पाहण्यासाठी अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन हा आनंद लुटला.