Karad Ganesh Visarjan : गणेशमूर्ती विसर्जनासाठी कराडात मोठा उत्साह; आतापर्यंत 109 गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन

Karad Ganesh Visarjan : रात्री साडेदहा वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
Karad Ganesh Visarjan
Karad Ganesh Visarjanesakal
Updated on
Summary

विसर्जनासाठी चावडी चौकातून कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या मंडळांना पालिकेतर्फे नारळ, रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

कराड : गणेश मूर्ती विसर्जनासाठी कराडमध्ये (Karad Ganesh Visarjan) मोठा उत्साह दिसत आहे. वाद्यांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जय घोषात विसर्जन मिरवणुका सुरू असून कराडमधील मुख्य चावडी चौकात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

विविध मंडळाकडून झांजपथक, पारंपरिक वाद्य यांना पसंती दिल्याचे चित्र आहे. रात्री साडेदहा वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी चावडी चौकातून कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या मंडळांना पालिकेतर्फे नारळ, रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

Karad Ganesh Visarjan
Karad Ganesh Visarjanesakal
Karad Ganesh Visarjan
केवळ दैव बलवत्तर, चंद्रकांत पाटील अपघातातून बचावले! भरधाव गाडीची ताफ्यातील मोटारीला धडक, सुरक्षारक्षक जखमी

अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार कल्पना ढवळे, वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. विसर्जन मिरवणुकीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री साडेदहा वाजेपर्यंत 109 गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.