Karad Politics : राजकीय समीकरणं बदलणार! निवडणुकांतील विरोधानंतर 'हे' दिग्गज नेते आले एकत्र; काय आहे कारण?

कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली.
Karad Politics
Karad Politicsesakal
Updated on
Summary

तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संबंध ताणले गेले आहेत.

कऱ्हाड : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपासून (Karad Politics) कऱ्हाड तालुक्यातील राजकीय नेत्यांची घडी विस्कटली आहे. त्यामुळे ज्या नेत्यांनी एकमेकांच्या साथीने निवडणुका लढवल्या ते कऱ्हाड दक्षिण आणि उत्तरचे आमदार बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.

Karad Politics
Nitesh Rane : 'त्यांनी कमळ चिन्हावरच लोकसभा लढवावी, म्‍हणजे कोणी दुखावणार नाही'; असं कोणाबद्दल म्हणाले राणे?

त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले (Atul Bhosale) हे नेते येथील बटाणे गल्लीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी एकत्र आले. त्याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Karad Politics
जयंत पाटलांच्या सुपुत्राकडून लोकसभेची तयारी? 100 गावांत गणपती आरतीसाठी हजेरी, माने-शेट्टींसह प्रतीक यांच्यात निवडणुकीची चिन्हे!

कऱ्हाड तालुका हा कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर या दोन मतदार संघातील विभागला आहे. कऱ्हाड दक्षिणवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचेच वर्चस्व आहे, तर कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मध्यंतरी झालेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत माजी सहकारमंत्री आमदार पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

Karad Politics
PM मोदींनी देशाची अर्थव्यवस्थाच अदानी, अंबानींना विकायचं ठरवलंय; 'वंचित'च्या सुजात आंबेडकरांचा घणाघात

त्या निवडणुकीत आमदार पाटील आणि आमदार चव्हाण गटाची जुळलेली नाळ तुटली. त्यावेळी आमदार पाटील यांना भाजपचे अतुल भोसले यांनी साथ दिली. त्यामुळे त्या निवडणुकीत आमदार पाटील यांचा विजय झाला. दरम्यान, त्याचवेळी यापुढील सर्व सहकारी संस्थांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार पाटील आणि भोसले गटाने एकत्रीतपणे लढवाव्या, अशी घोषणा त्या पॅनेलच्या ज्येष्ठांना केली होती.

Karad Politics
धक्कादायक! गणपती विसर्जनावेळी DJ च्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू? मंडळांतील 'ईर्षा' ठरली मृत्यूचं कारण

त्यानुसार कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणुक आमदार पाटील, अतुल भोसले यांनी संयुक्तपणे पॅनेल टाकुन लढवण्याची घोषणा केली. त्यावेळी सत्ताधारी अॅड. उदयसिंह उंडाळकर यांनीही स्वतंत्रपणे पॅनेल टाकून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांना माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी थेट प्रचारात उतरुन साथ दिली. त्या निवडणुकीत अॅड. उंडाळकर यांच्या पॅनेलचा विजय झाला.

त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संबंध ताणले गेले आहेत. त्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच येथील बटाणे गल्लीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी खासदार पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार पाटील, भाजपचे कार्यकारणी सदस्य भोसले हे नेते एकत्र आले. त्याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Karad Politics
'हिंदुस्थान हे हिंदवी राज्यच आहे, म्हणूनच इतर धर्म इथं राहू शकले'; गणपती पंचायतन संस्थानच्या प्रमुखांचं वक्तव्य

खासदार श्रीनिवास पाटील कॉमन मॅन

खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या वक्तृत्व शैलीतून आणि विकासकामांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याकडे विकास कामांची मागणी करण्यासाठी सर्वपक्षीय लोक जातात. त्यांच्याकडेही गट-तट न पाहता विकास कामे दिली जातात, असे अनेकांचे अनुभव आहेत. त्यातच तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे राजकीय निवडणुकांतून संबंध ताणलेले असले तरी खासदार पाटील यांचे मात्र सर्वांबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांच्याकडे कॉमन मॅन म्हणून पाहिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.