Ganeshotsav 2023 : गणपतीच्या स्वागतावेळी फरशीवरून पाय घसरल्याने भक्ताचा दुर्दैवी अंत; डोक्याला गंभीर दुखापत

गणेशाचे पूजन करण्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
Kolhapur Ganeshotsav
Kolhapur Ganeshotsavesakal
Updated on
Summary

सचिन हे पत्नी व पाच वर्षांच्या मुलाला मुंबईत ठेवून गणेशोत्सवासाठी गावी आले होते.

आजरा : गणरायाच्या स्वागतासाठीच्या (Kolhapur Ganeshotsav) धांदलीत पाय घसरून पडल्याने एका भाविकाचा काल (मंगळवार) मृत्यू झाला. आजरा तालुक्यातील बोलकेवाडी (Ajara Bolkewadi) येथे ही दुर्घटना घडली. सचिन शिवाजी सुतार (वय ४२, रा. बोलकेवाडी) असे त्यांचे नाव आहे.

Kolhapur Ganeshotsav
Kolhapur Ganeshotsav : गणरायांच्या आगमनालाच दणदणाट; रशियन DJ लिंडाने थिरकवली तरुणाई, रात्री 12 ला पोलिसांनी बंद केल्या सिस्टीम

ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाची धामधूम सुरू असताना घरातील कर्ता मुलगा गमवावा लागल्याने सुतार कुटंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सचिन मुंबई (Mumbai) येथे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ते गणेशोत्सवासाठी सोमवारी (ता. १८) गावी आले होते.

गणरायाच्या स्वागताची सुतार कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती. काल गणपतीची मूर्ती आणण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. त्यांचा घरगुती गणपती मित्र घेऊन आला. मूर्ती घेऊन दोघेही घरासमोर आले. गणपतीचे स्वागत करण्यासाठी आईला बोलावण्यासाठी ते धावतच घरात निघाले. त्याचवेळी त्यांचा पाय फरशीवरून घसरल्याने ते जोरात डोक्यावर पडले.

Kolhapur Ganeshotsav
यंदाच्या गणेश चतुर्थीला ‘या’ प्रसिद्ध गणपती मंदिरांना नक्की भेट द्या...

त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आजऱ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे सारा गाव सुन्न झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, विवाहित बहीण व भाऊ असा परिवार आहे.

Kolhapur Ganeshotsav
Angaraki Sankashti Chaurthi 2024 : गणेश पुराण नक्की काय आहे? कथा की जीवनसार? जाणून घ्या

ते परतलेच नाहीत...

सचिन हे पत्नी व पाच वर्षांच्या मुलाला मुंबईत ठेवून गणेशोत्सवासाठी गावी आले होते. दुसऱ्या दिवशी मुंबईला परतणार, असे ते पत्नी व मुलाला सांगून आले होते. गणेशाचे पूजन करण्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे बोलकेवाडी गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.