Kolhapur Ganeshotsav : बाळूमामापासून ते चांद्रयानपर्यंत..; कोल्हापुरात तांत्रिक देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी; कोठे काय पहाल?

गणेशोत्सव आता सांगतेकडे निघाला आहे.
Kolhapur Ganeshotsav Dekhava
Kolhapur Ganeshotsav Dekhavaesakal
Updated on
Summary

आकर्षक मूर्ती, सजीव व तांत्रिक देखावे पाहण्यासाठी सायंकाळनंतर मोठी गर्दी होऊ लागली आहे.

Kolhapur Ganeshotsav Dekhava : गणेशोत्सव आता सांगतेकडे निघाला असून आकर्षक मूर्ती, सजीव व तांत्रिक देखावे पाहण्यासाठी सायंकाळनंतर मोठी गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध मूर्ती, तांत्रिक व सजीव देखाव्यांविषयी..

राजारामपुरी परिसर

  • शिवाजी तरुण मंडळ, दुसरी गल्ली ः आदियोगी शंकराचे मंदिर प्रतिकृती

  • एकता मित्र मंडळ, तिसरी गल्ली ः पपेट शो

  • राजारामपुरी स्पोर्टस्, तिसरी गल्ली ः आकर्षक गणेश मंडप

  • जय मराठा मंडळ, चौथी गल्ली ः संत बाळूमामा तांत्रिक देखावा

  • विवेकानंद मित्र मंडळ, पाचवी गल्ली ः स्वराज्यनिष्ठा सजीव देखावा

  • शहीद भगतसिंग मंडळ, सहावी गल्ली ः तिरुपती बालाजी मंदिर

  • न्यू फ्रेंड्‍स सर्कल, सातवी गल्ली ः संत नामदेवांची विठ्ठलभक्ती

  • सेव्हन कलर्स फ्रेंड्स सर्कल, आठवी गल्ली ः गुहा व शिव मंदिर

  • सुवर्ण झंकार मित्र मंडळ, आठवी गल्ली ः चांद्रयान तीन मोहीम

  • पद्मराज स्पोर्टस्, नववी गल्ली ः आकर्षक मंडप

  • इंद्रप्रस्थ तरुण मंडळ, दहावी गल्ली ः राज दरबार

  • राजारामपुरी तरुण मंडळ, अकरावी गल्ली ः थ्री डी लायटिंग.

Kolhapur Ganeshotsav Dekhava
पुढच्या वर्षी लवकर या! पारंपरिक वाद्यांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाला निरोप; कृष्णातिरी भाविकांची अलोट गर्दी

शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर परिसर

  • नरसिंह तरुण मंडळ : विष्णू योद्धा अवतार रुपात गणेशमूर्ती

  • विश्‍वशांती तरुण मंडळ : श्री दत्त अवतार रुपात २१ फुटी गणेशमूर्ती

  • जय शिवराय मित्र मंडळ, उद्यमनगर ः छत्रपती शिवाजी महाराज ः भारतीय आरमाराचे जनक

  • वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळ : करवीरचा राजा रुपात २१ फुटी गणेशमूर्ती

  • यादव नगर मित्र मंडळ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुपात गणेशमूर्ती (एकच ध्यास करवीरचा विकास)

  • मंगलमूर्ती मित्र मंडळ : श्री पार्वतीमाता गणपतीला मोदक खायला देते अशा रुपात गणेशमूर्ती

  • भारत मित्र मंडळ : फुटबॉल गोलीच्या रुपात गणेशमूर्ती

  • आर. एम. बॉईज मित्र मंडळ : भारत माता रुपात गणेशमूर्ती चांद्रयान-३ उड्डाणाचा तांत्रिक देखावा

  • श्रीराम क्रीडा मंडळ : आकाशगंगेतून हनुमानाच्या पाठीवर उभी असलेली राम रुपात गणेशमूर्ती

  • श्री शाहूनगर मित्र मंडळ : बैठी फायबरची महाकाय मूर्ती

  • श्री बलभीम तरुण मंडळ : श्री शंकराच्या रुपात सरस्वतीचे वीणावादन करताना गणेशमूर्ती

  • आदर्श तरुण मंडळ : भक्त प्रल्हादाचा सजीव देखावा

  • धर्मवीर तरुण मंडळ : पर्यावरणपूरक घंटांपासून श्री गणेशाची मूर्ती निर्मिती

  • शांतीदूत कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ : बारा ज्योतिर्लिंगावर श्री शंकराच्या जटेतून गंगेचे अवतरण (तांत्रिक देखावा)

  • बालावधूत मित्र मंडळ : चांद्रयान- ३ ची पृथ्वीला प्रदक्षिणा आणि चंद्रावर चांद्रयान तीन उतरणार हा तांत्रिक देखावा

Kolhapur Ganeshotsav Dekhava
Kolhapur Ganpati Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; तब्बल 2 लाख 80 हजार गणेशमूर्तींचे संकलन

शाहूपुरी परिसर

  • व्हीनस कॉर्नर मित्र मंडळ ः सूर्यनारायणास धरायला निघालेला बालहनुमान- तांत्रिक देखावा

  • त्रिमूर्ती मित्र मंडळ (उषा टॉकीज पिछाडीस) ः वृद्घाश्रमावर आधारित ‘अडगळीतील देव’ हा देखावा

  • गणेश मंडळ, शाहूपुरी पहिली गल्ली ः अमरनाथ दर्शन

  • राधाकृष्ण तरुण मंडळ ः केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

  • शाहूपुरी युवक मित्र मंडळ ः भारताची चांद्रयान मोहीम तांत्रिक देखावा

  • गणेश तरुण मंडळ ः क्रांतिकारी वीरांगणा सजीव देखावा

  • शिवनेरी तरुण मंडळ ः बालचमूंसाठी डिस्ने वर्ल्ड

रविवार पेठ परिसर

  • दिलबहार तालीम मंडळ : गणेश मंडपामध्ये विविध शक्तिस्थानांचे दर्शन

  • पूल गल्ली तालीम मंडळ : महादेवाच्या रुपातील भव्य आकर्षक मूर्ती

  • सर्वोदय मित्र मंडळ : चांद्रयान मोहीम

  • गणराज मित्र मंडळ (उमा टॉकीज चौक) : आकर्षक गणेशमूर्ती

  • उमा चौक तालीम मंडळ : गौरी तू आता दुर्गा हो रुपात गणेशमूर्ती

Kolhapur Ganeshotsav Dekhava
Satara Ganeshotsav : कौतुकास्पद! 'या' गावात मुस्लीम बांधवांनी केली गणेशाची आरती; राज्यासमोर ठेवला नवा आदर्श

मंगळवार पेठ परिसर

  • प्रिन्स क्लब, खासबाग : मुलांच्या आत्महत्येवर तांत्रिक व सजीव देखावा

  • ब्लड ग्रुप : आकर्षक मयुरारुढ गणेशमूर्ती

  • श्री तरुण मंडळ (कोष्टी गल्ली नंबर दोन) : अडतीस फुटी फायबरची शेषनारायण मूर्तीची प्रतिकृती

  • स्वस्तिक तरुण मंडळ (कोष्टी गल्ली नंबर एक) : एलईडी बल्बच्या माध्यमातून तिरुपती दर्शन

  • लेटेस्ट तरुण मंडळ : दर्याबहाद्दूर सरखेल कान्होजी आंग्रे सजीव देखावा

  • दत्ताजीराव काशीद चौक मित्र मंडळ : गठळ्यापासून सावधान विनोदी सजीव देखावा

  • कलकल ग्रुप, ताराराणी विद्यालय ः सतराव्या शतकातील पुरातन मूर्ती

  • तुकाराम माळी तालीम मंडळ ः सिंहासनारुढ मूर्ती

  • पाटाकडील तालीम मंडळ ः लालबागचा राजा मूर्ती

  • जादू ग्रुप, टेंबे रोड ः हॉरर गुहा

  • जय पद्मावती मंडळ, बेलबाग ः थायलंडमधील पुरातनकालीन मूर्ती

  • न्यू बिनधास्त सांस्कृतिक, क्रीडा मंडळ ः केदारनाथ मंदिर प्रतिकृती

  • श्री विठ्ठल भक्तिसेवा मंडळप्रणित रॅश ग्रुप ः फुलपाखराच्या झोपाळ्यावरील गणेशमूर्ती

  • अर्जुन मित्र मंडळ, बेलबाग ः किल्ल्यांची दुरवस्था दाखवणारा गणेश

  • टायगर मित्र मंडळ ः सायकल ते चांद्रयान - ३

  • महालक्ष्मीनगर तरुण मंडळ ः प्राचीन मूर्ती

गंगावेस, शिवाजी पेठ परिसर

  • श्री तरुण मंडळ ः गदेवर आरुढ आकर्षक मूर्ती

  • गोल सर्कल मित्र मंडळ, रंकाळा स्टॅंड ः लालबागचा राजा दरबार

  • (कै.) उमेश कांदेकर युवा मंच ः विशाळगडावर आधारित सजीव देखावा

  • गोल्डस्टार स्पोर्टस् ः पावनखिंड सजीव देखावा

  • निवृत्ती तरुण मंडळ ः बालमित्रांसाठी ॲम्युझमेंट पार्क

  • नाथा गोळे तालीम मंडळ ः काल्पनिक मंदिराची प्रतिकृती

  • मित्र प्रेम मंडळ, कपिलतीर्थ ः नायनाट स्वराज्यद्रोह्यांचासजीव देखावा

  • श्री एकदंती तरुण मंडळ, प्रधान बोळ ः गणरायाला मूषक चौरंगावरून आकाशगंगेची सफर घडवतानाची आकर्षक मूर्ती

Kolhapur Ganeshotsav Dekhava
Ganpati Visarjan : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर साउंड सिस्टीमसह पारंपरिक वाद्यांवर बंदी!

महापालिका, लक्ष्मीपुरी परिसर

  • छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ ः एकवीस फुटी महागणपती

  • संयुक्त छत्रपती शिवाजी चौक मंडळ ः आकर्षक मूर्ती

  • मेढे तालीम मंडळ ः धनकवडीचे शंकर महाराज देखावा

  • जनरल मटण-फिश मार्केट मंडळ ः संत बाळूमामा देखावा

  • सोमवार पेठ तरुण मंडळ ः गरुडावर स्वार रूपातील मूर्ती

  • स्वयंभू गणेश मित्र मंडळसोशल मीडियाच्या विळख्यातून समाजाला मुक्त करणाऱ्या रूपातील गणेशमूर्ती

  • गाईड मित्र मंडळ ः ऑक्टोपसवर स्वार गणेशमूर्ती

  • श्री. सत्यनारायण तालीम मंडळ - कैलास पर्वतातून प्रगट झालेल्या शंकर महाराज यांच्यावरील देखावा

  • दक्षता तरुण मंडळ (पोलिस लाईन)प्राचीन काळातील अवतार रूपातील गणेशमूर्ती

  • राजेश सांस्कृतिक मंडळ (बलराम कॉलनी, सुतारमळा)- आकर्षक गणेशमूर्ती

  • कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळ- काल्पनिक मंदिराची १५ फुटी प्रतिकृती

  • देशप्रेमी तरुण मंडळ (सुभाष रोड)- भगवान शंकराच्या रूपातील गणेशमूर्ती

  • शिवशक्ती तरुण मंडळ (फोर्ड कॉर्नर)- श्रीराम अवतारातील गणेशमूर्ती

  • न्यू लक्ष्मीपुरी मित्र मंडळ (फायटर्स ग्रुप)- श्रीराम अवतारातील गणेशमूर्ती

  • श्री. गोरक्षनाथ मित्र मंडळ - आकर्षक गणेशमूर्ती

  • संयुक्त सेवा मंडळ- चांद्रयान मोहिमेची माहिती देणारा देखावा

  • न्यू यंगस्टार फ्रेंड्‍स सर्कल-आकर्षक गणेशमूर्ती

जुना बुधवार, शनिवार पेठ परिसर

  • सोल्जर ग्रुप, तोरस्कर चौक ः कैलास गणपती देखावा

  • हाय कमांडो फ्रेंड्‍स सर्कल ः जुना बुधवार पेठेचा वसा आणि वारसा देखावा

  • डांगे गल्ली तरुण मंडळ ः मतदान कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती शिबिर

  • नुक्कड मित्र मंडळ ः शंकराच्या त्रिशुलावर झुलणारी गणेशाची आकर्षक मूर्ती

  • जुना बुधवार तालीम ः अठरा फुटी भव्य मूर्ती

  • भगतसिंग तरुण मंडळ ः शिवशंकर रुपातील अकरा फुटी गणेशमूर्ती

  • जयभवानी चौक म्हसोबा ट्रस्ट ः शेतकरी रुपातील गणेश देखावा

  • एसपी बॉईज, शनिवार पेठ ः चिंतामणी गणेश

  • सम्राट चौक ः चिंतामणी गणेशमूर्ती

  • अष्टविनायक ग्रुप ः श्रीराम रूपातील सेतू बांधतानाचा गणेश

Kolhapur Ganeshotsav Dekhava
Konkan Ganeshotsav : चाकरमान्यांच्या गर्दीमुळं कणकवली रेल्‍वे स्थानकात कडक बंदोबस्त; आठ पोलिसांसह 20 जवान तैनात

कसबा बावडा परिसर

  • गणेशपूजा मित्र मंडळ, कवडे गल्ली - रणरागिणी ताराराणी सजीव देखावा

  • भारतवीर मित्र मंडळ, चौगले गल्ली - चक्रव्यूह सजीव देखावा

  • स्वास्तिक मित्र मंडळ, तालीम चौक - हिरकणी कडा चढणारी ‘वीर हिरा’ सजीव देखावा

  • नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक, उलपे गल्ली - ‘परिचय अपरिचित मावळ्यांचा’ सजीव देखावा

  • कागलवाडी मित्र मंडळ - ‘वर्गणी’ वर आधारित सजीव देखावा

  • सस्पेन्स स्पोर्टस् असोसिएशन, हनुमान मंदिर - आकर्षक मूर्ती

  • जयशिवराय तरुण मंडळ, ठोंबरे गल्ली - वीर शिवा काशीद सजीव देखावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.