बंदोबस्तावरील पोलिसांनाही 'लेसर'चा धोका; मिरवणुकांमध्ये बंदी घालण्याची मागणी, 'त्या' युवकाची डोळ्याची जखम गंभीर

Kolhapur Ganeshotsav : कार्यकर्त्यांसह बंदोबस्तावरील पोलिसांनाही धोका असल्याने मिरवणुकीतील घातक लेसरवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
Kolhapur Ganeshotsav
Kolhapur Ganeshotsavesakal
Updated on
Summary

लेसर किरणावर सार्वजनिक मिरवणुकीत बंदी असतानाही अनेक सार्वजनिक मंडळे याचा वापर करत आहेत.

कोल्हापूर/ उचगाव : उचगावातील मिरवणूक (Kolhapur Ganeshotsav) पाहण्यास आलेल्या आदित्य पांडुरंग बोडके (वय २१, मणेरमळा) याच्या डोळ्याला प्रखर लेसर किरणांमुळे इजा झाली. डोळ्यातून झालेल्या रक्तस्रावावर तो उपचार घेत आहे. पुढील चार ते पाच दिवस उपचार चालणार आहेत, तर विक्रमनगरात बंदोबस्तावेळी लेसरमुळे डोळ्यांना दुखापत झालेले पोलिस हवालदार (Police Constable) युवराज पाटील यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.