Lalbaugcha Raja : नऊ दशकांपासून कांबळी कुटुंबाने जपलाय वसा, जाणून घ्या कशी घडते लालबागच्या राजाची मूर्ती ?

The Lalbaugcha Raja statue in Mumbai : लालबागचा राजा साकारणारी ही कांबळी कुटुंबाची तिसरी पिढी आहे
Lalbaugcha Raja
Lalbaugcha Rajaesakal
Updated on

 Lalbaugcha Raja :

देशभरात उत्साहाचे वातावरण आहे,घराघरात अन् मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मुंबईत मानाच्या गणेश मुर्तींचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीसह सामान्य लोकांच्याही रांगा लागल्या आहेत. लालबागचा राजाचा दरबारही भरला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारं मुंबईतील कांबळी कुटुंब बाप्पांची अनेक वर्ष सेवा करत आहेत. 

गणपती बाप्पा आले अन् आज ते निघालेही कारण आज घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे. आजपासूनच मोठ्या मंडळांचे देखावे पहायला लोक बाहेर पडतात. आज आपण लालबागच्या राजाच्या मूर्ती अन् मूर्तीकाराबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

Lalbaugcha Raja
lalbaugcha raja: अनंत अंबानी पाहणार 'लालबागच्या राजा'चा कारभार! मंडळाचा महत्वाच्या पदावर झाली नियुक्ती!

लालबागच्या राजाचे मंडळ हे मुंबईतील सर्वात मोठे आणि सर्वात जुने आहे. इथे दररोज दिड लाख भाविक दर्शन घेतात. घरगुती गणेश विसर्जनानंतर लालबाबगच्या राजाच्या चरणी भक्तांची लगबग वाढते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडळाची स्थापना 1928 मध्ये झाली आणि तेव्हापासून ते मुंबईच्या सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग बनले आहे.

लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या संतोष कांबळी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “लालबागचा राजा साकारणारी ही कांबळी कुटुंबाची तिसरी पिढी आहे. माझ्या आजोबांनी 1935 मध्ये ही परंपरा सुरू केली होती. त्यांचे आजोबा मधुसूदन दोंडूजी कांबळी यांनी गणपती बाप्पाच्या सेवेची पायाभरणी कशी केली हे सांगताना ते म्हणतात की, आमच्या आजोबांनी हातांनी केलेली लालबागच्या राजाची प्रतिकृती आज देशभरातील लोकांच्या भक्तीचे प्रतीक बनली आहे. आज संतोष त्याच्या वडिलांसोबत ही कौटुंबिक परंपरा पुढे नेत आहे.

लालबागच्या राजाची सुरूवातीच्या काळातील मूर्ती
लालबागच्या राजाची सुरूवातीच्या काळातील मूर्ती esakal
Lalbaugcha Raja
Raja Shivaji: "ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं…"; शिवजयंतीनिमित्त रितेश आणि जिनिलियानं केली 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा

आम्ही याकडे केवळ आपला व्यवसाय म्हणून पाहत नाही, तर समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आणि श्रीगणेशावरील भक्ती म्हणून पाहतो,” असेही कांबळी यांनी सांगितले.

कांबळी कुटुंबाचा इतिहास जवळपास नऊ दशकांचा आहे. या कुटुंबातील प्रत्येक पिढी मूर्तीमागील कलात्मकता अधिक चांगली कशी करता येईल याचा विचार करते. संतोष यांचे मामा व्यंकटेश यांनी 1960 च्या दशकात लालबागच्या अनोख्या मूर्ती बनवण्यात मदत केली.

लालबागच्या राजाची सध्या आपण पाहत असलेली मूर्ती संतोष आणि त्याचे वडील यांनीच बनवली. संतोष कांबळी हे केवळ शिल्पकार नाहीत; ते एका परंपरेचे संरक्षक आहेत. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे अन् ती पुढे अविरत सुरू राहणारी आहे. संतोष यांनी बनवलेली बाप्पाची खास मूर्तीच दरवर्षी लाखो भक्तांना स्वत:कडे आकर्षित करते.

लालबागचीच नव्हे तर इतर मूर्ती घडवतानाही  केवळ माती आणि प्लास्टर चांगले असून चालत नाहीत. मूर्तीकाराला जीव ओतून ती बनवावी लागते, संतोष नेमकं हेच करतात. ते या मूर्तीला बनवणं म्हणजे देवाची सेवा म्हणूनच पाहतात.

लालबागच्या राजाची निर्मिती ही एका दिवसाची नाही. त्यासाठी दोन-तीन महिने अथक परिश्रम लागतात. लालबागच्या राजाच्या निर्मितीबद्दल संतोष सांगतात की, लालबागच्या राजाची मूर्ती बनवण्याचा शुभारंभ केल्यानंतर आम्ही आमची तयारी सुरू करतो.

आम्ही पुराण आणि ग्रंथांतील गणपतीच्या कलात्मक मूर्तीचे अनुसरण करतो. त्यातून आम्हाला परंपरा आणि नाविन्य यांचा हा समतोल साधता येतो. तसेच, देवांची मूर्ती घडवताना त्यांचा शास्त्रोक्त अभ्यास असणेही गरजेचे आहे, असेही संतोष यांनी सांगितले.   

Lalbaugcha Raja
Nashikcha Raja: 'नाशिकचा राजा’चे शुक्रवारी घेता येणार मुखदर्शन! ढोल-ताशांच्या गजरात होणार स्वागत; यंदा देणार पर्यावरणाचा संदेश

लालबागच्या राजाची मूर्ती तिच्या जिवंतपणासाठीओळखली जाते. ते म्हणतात, जेव्हा भक्त लालबागच्या राजाकडे पाहतात, तेव्हा त्यांना अनेकदा असे वाटते की देव साक्षात त्यांच्या समोर बसला आहे.  

कालच त्यांना कळले की, “अनंत अंबानी, जे अलीकडेच मंडळ समितीचा भाग बनले होते, त्यांनी लालबागच्या राजाला सुमारे १७ कोटी किमतीचा २० किलोचा सोन्याचा मुकुट दान केला होता. या मुकुटावरील नक्षीकाम अतिषय कोरीव अन् बारकाईने केल्याचेही संतोष यांनी सांगितले.

लालबागच्या राजाचे वेगळेपण त्याच्या प्रमाणात आणि मुद्रेत आहे. ही मुर्ती देशातील सर्वात उंच गणेशाची मूर्ती आहे. लालबागच्या राजाला वेगळे करणारी गोष्ट म्हणजे त्याचे नाजूक पण भव्य स्वरूप. संतोष म्हणतात की, “आम्ही बाप्पाची मूर्ती आकाराने प्रभावशाली आणि तितकीच आकर्षक असावी याची खात्री करण्यासाठी त्याच्या प्रमाणांकडे काळजीपूर्वक लक्ष देतो.” मूर्तीच्या वैशिष्ट्यांमध्ये चेहरा, सौम्य स्मित आणि एक अद्वितीय बसण्याची शैली यांचा समावेश आहे. ज्यामुळे ती गणपतीच्या इतर मूर्तींपेक्षा वेगळी बनते.

आम्ही सिंहासनावर बसलेल्या लालबागच्या राजाची शिल्पे साकारतो, जी आम्ही दरवर्षी बारकाईने नव्याने बनवतो, हे आसन लालबागच्या राजाला शोभेल असे शाही स्वरूप देते.” दैवी रूप पूर्ण करणारे कपडे आणि इतर सामान मंडळाकडून दिले जाते, असेही संतोष कांबळी यांनी स्पष्ट केले.

Lalbaugcha Raja
Nashikcha Raja: 'नाशिकचा राजा’चे शुक्रवारी घेता येणार मुखदर्शन! ढोल-ताशांच्या गजरात होणार स्वागत; यंदा देणार पर्यावरणाचा संदेश

मुंबईचा पाऊस ठरतो अडथळा

राजाची मूर्ती घडवताना अनेक आव्हाने येतात. मुंबईचा पाऊस एका पातळीनंतर धोकादायकरित्या वाढतो. त्यामुळे आम्हाला योग्य ती काळजी घेऊन सतत दक्ष रहावे लागते. पावसाळ्यात असलेला ओलावा मूर्तीच्या सुकण्यात मोठा अडथळा ठरतो. आमची टीम हलोजन दिवे आणि पंखे वापरून मूर्ती लवकर सुकवते.

मूर्तीवरील रंग सुकवणे हे महाकठीण काम असते. कारण, जर मूर्ती अन् त्यावरील रंग पूर्णपणे सुकले नाहीत. तर, जेव्हा लोक गणेशाची मूर्ती मंडळांकडे नेतात तेव्हा त्यावर थोडासा जरी पाऊस पडला तरी त्यावरील रंग निघू शकतो.

वर्षानुवर्षे, कांबळी कुटुंबाने वादळ,पाऊस कशाचीही पर्वा न करता, संपूर्ण उत्सवात लालबागचा राजाचे आपले सौंदर्य टिकवून ठेवण्याचे काम केले आहे,असेही संतोष म्हणाले.

लालबागचा राजा बनवण्यासाठी कुठून आणले जाते कच्चे सामान?

लालबागचा राजा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य मुंबईतून स्थानिक पातळीवर आणले जाते. आमची सर्व सामग्री आम्ही वर्षानुवर्षे जोडून ठेवलेल्या लोकांकडून घेतो. मूर्तीसाठी प्राथमिक साहित्य प्लास्टर आहे, जे केवळ विसर्जन प्रक्रियेसाठीच नाही तर पर्यावरणास अनुकूल देखील आहे, कारण ते पाण्यात सहज विरघळते.

मुंबईतील कांबळी कुटुंबिय
मुंबईतील कांबळी कुटुंबियesakal

कांबळी कुटुंबाकडे आहे लालबागच्या राजाचा कॉपीराईट

लालबागच्या राजाचे वेगळेपण जपण्यासाठी कांबळी कुटुंबिय कटिबद्ध आहे.मूर्तीची रचना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मूर्तीवर कॉपीराइट नोंदवला आहे. ते म्हणतात, “आम्ही लालबागच्या राजाचा खरेपणा आणि आध्यात्मिक महत्त्व जपण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

Lalbaugcha Raja
Lalbaugcha Raja: १९३४ ते २०२४ लालबागच्या राजाचे कधी नं पाहिलेले फोटो; शुभ आशीर्वादाने करा दिवसाची सुरूवात

श्रद्धेची किंमत करता येत नाही

दरवर्षी, कॉयर, प्लास्टर आणि पाणी यासारख्या कच्च्या मालाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. परिणामी, आमच्या उत्पादन खर्चात दरवर्षी 10-20 टक्के तफावत असते. भक्तांना लालबागच्या राजाची छोटी दैवी मूर्ती घरी नेता यावी यासाठी भक्तांना परवडेल असे दर आम्ही ठेवतो.

आम्ही नेहमी नफ्यापेक्षा आमच्या कामाच्या आध्यात्मिक आणि कलात्मक मूल्यांना प्राधान्य देतो,” संतोष पुढे सांगतो.

ही कला टिकवणे अवघड

कलेची ही परंपरा टिकवून ठेवण्याच्या आव्हानांवर संतोष चिंतन करतो. ते म्हणतात, “माझ्यासारखी फार कमी कुटुंबे आहेत जी मूर्ती घडवण्यात सक्रिय सहभाग घेतात. या आव्हानांना न जुमानता तो आशावादी आहे. आम्ही मूर्ती घडवण्याचा कलाप्रकार तीन पिढ्यांपासून जपला आहे आणि आम्ही ती पुढेही सुरू ठेवू अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.