Miraj Ganeshotsav : मिरजेत सामाजिक एकोप्याचा गणेशोत्सव; तब्बल 67 वर्षांपूर्वी मुस्लिम बांधवांकडून सुरवात

Shivaji Ganeshotsav Mandal : प्रतिवर्षी कोणताही डीजे किंवा लेसर प्रकाशाचा अतिरेक टाळून सामाजिक एकोपा आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश या मंडळाकडून दिला जातो.
Miraj Ganeshotsav
Miraj Ganeshotsav esakal
Updated on
Summary

प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांचा वापर न करता सर्जा-राजाच्या बैलगाडीतून श्री गणरायांना वाजत-गाजत निरोप देण्याची मंडळाची परंपरा आहे.

मिरज : सामाजिक एकोपा राखत एका मुस्लिम बांधवांकडून (Muslim Community) सुरू करण्यात आलेल्या श्री विठ्ठल मंदिर, नदीवेस, पवार गल्ली येथील श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळाला (Shivaji Ganeshotsav Mandal) ६७ वर्षांची अखंड परंपरा लाभली आहे. तसेच या मंडळाकडून तब्बल १८ वर्षे व्याख्यानमालेद्वारे प्रबोधनाचे काम सुरू आहे. टाळ-मृदंगाच्या जयघोषात आगमन आणि विसर्जन मिरवणूक या मंडळाकडून काढली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.