शिरवडे (जि.सातारा) : शिरवडे रेल्वे स्टेशन येथील कोरोनाबाधित परिवारास मुस्लिम बांधवांनी मदत केली. श्री गणेशमूर्ती, प्रसाद, किराणा माल अशा स्वरूपात मदत करून हिंदू- मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. शिरवडे रेल्वे स्टेशनवर एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला. शेजारीच राहणारे मोहसीन संदे यांनी त्यांना किराणा माल आणून दिला. नंतर याच घरात दुसरा रुग्ण सापडला. त्यामुळे या घरातील वातावरणात चिंतेची आणखी भर पडली.
शाहूनगरीत हर्षोल्हासात बाप्पांचं आगमन
पहिल्या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल रात्री उशिराने मिळाला. हे समजताच मसूर येथील चिनार मेडिकलचे दिलावर सुतार व त्यांचा मुलगा मुबीन यांनी आवश्यक औषधोपचाराच्या गोळ्या तब्बल रात्री साडेअकरा वाजता पोच केल्या. दुसऱ्या दिवशी मुबीन व सद्दाम यांनी बाजारपेठेतून बाधित कुटुंबातील तरुणास व्हॉटस्ऍपवरून फोटो पाठवून श्रीगणेशमूर्ती ठरवली. लागणारे पूजा साहित्य, मोदकही आणले. जातीय तेढ, आकस आपण कित्येकदा ऐकतो, पाहतो; परंतु हे उदाहरण नक्कीच बेमिसाल ठरेल.
युरियावर अन्य खत मारले जाते माथी!, कृषी सेवा केंद्र बदलले, की बदलतो भाव
शिरवडे स्टेशन येथील जमाल संदे, वासिम संदे, हरुण संदे, शब्बीर संदे, रियाज संदे, इरफान संदे, शौकत संदे, रज्जाक संदे या सर्व मुस्लिम बांधवांनी मदत व विचारपूस करून हिंदू- मुस्लिम ऐक्याचे चांगले उदाहरण उभारले. "सकाळ'चे बातमीदार जयंत पाटील व मोहसिन संदे यांनी बाधित कुटुंबास आवश्यक वस्तू पुरवून मानसिक आधारही दिला. श्री गणेशाची मूर्ती पोच करताना आनंद वेगळा होता. निसर्गाने एक संधी दिलेली आहे. असाच सलोखा सर्वत्र राहिल्यास वादाचा प्रश्नच येणार नाही.
भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.