Ganesh Visarjan 2024: पर्यावरण रक्षणाचा संदेश; जलप्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी कलाकाराच्या मदतीने साकारली तुरटीयुक्त बाप्पा मूर्ती

Ganesh Visarjan 2024: पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे निर्देश दरवर्षी शासनातर्फे दिले जातात. जलप्रदूषण कमीत कमी व्हावे हा शासनाचा त्यामागे मूळ हेतू असतो.
Ganesh Visarjan 2024:
Ganesh Visarjan 2024:Sakal
Updated on

Ganesh Visarjan 2024: पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे निर्देश दरवर्षी शासनातर्फे दिले जातात. जलप्रदूषण कमीत कमी व्हावे हा शासनाचा त्यामागे मूळ हेतू असतो. याच उद्देशाची पूर्ती करत रामदेवबाबा विद्यापीठाचा दरवर्षी पर्यावरणपूरक गणशोत्सव साजरा करण्यावर विशेष भर असतो. यंदा विद्यार्थ्यांनी कलाकाराच्या मदतीने विद्यापीठ परिसरात जलप्रदूषण कमी करणाऱ्या तुरटीच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.

मूर्ती पाण्यात विरघळण्याबरोबरच प्रदूषित पाणी देखील शुद्ध करेल. पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा झाल्यास गृहिणी पाण्याच्या शुद्धीसाठी तुरटीचा घरगुती उपाय करतात. तुरटीमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात. नैसर्गिक मिठाने पाणी शुद्ध करण्यास मदत होते. पोटॅश तुरटी ९२ अंश सेल्सिअसवर वितळते आणि १२० अंश सेल्सिअसच्या आसपास उकळू लागते. त्यानंतर सुमारे ३० मिनिटे थंड होऊ दिल्यानंतर गणेशाच्या आकारात बनवलेल्या साच्यामध्ये द्रव तुरटी टाकली जाते. ही मूर्ती तुरटीची असली तरी मातीच्या इतर मूर्त्यांप्रमाणेच दिसायला आकर्षक असते.

अदासा येथील मूर्तीची प्रतिकृती

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एका गणेश मूर्तींच्या प्रतिकृतीची स्थापना करण्याचा विद्यापीठाचा कल असतो. गेल्या वर्षी, विद्यापीठाने गणेश टेकडी येथील मूर्तीच्या प्रतिकृतीची स्थापना केली. यावर्षी, अदासा येथील प्रसिद्ध गणेश मूर्तीच्या प्रतिकृतीची स्थापना रामदेवबाबा मंदिर परिसरात करण्यात आली आहे. विद्यापीठात बसवण्यात आलेली व तुरटीपासून बनवलेली ही सहावी मूर्ती आहे.

Ganesh Visarjan 2024:
Besan Modak Recipe: लाडक्या बाप्पासाठी सहाव्या दिवशी बनवा स्वादिष्ट बेसण मोदक, बाप्पा होतील प्रसन्न

गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रम

विद्यार्थ्यांनी सहमताने अनाथालयातील मुलांना आवश्यक कपडे दान करण्याचे ठरवले असून काटोल नाका चौकातील बाल सदन या अनाथालयात विद्यापीठातील विद्यार्थी कपडे दान करणार आहेत. विद्यापीठाबाहेर दानपेटी ठेवण्यात येणार असून इच्छुक विद्यार्थी दिनांक १६ सप्टेंबरला कपडे दानपेटीत टाकतील. तसेच स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीकोणातून एक दिवसाचे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.