Rishi Panchami 2024 : गणपती बाप्पांच्या आगमनानंतर येणारी ऋषी पंचमी महिलांसाठी का आहे खास?

Rishi panchami 2024 Date And Shubh Muhurt : हा उपवास केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूजनीय समजल्या जाणाऱ्या सप्तऋषींचे आशीर्वाद प्राप्त होतात
Rishi Panchami 2024
Rishi Panchami 2024 esakal
Updated on

Rishi panchami 2024 Date And Shubh Muhurt :

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते. हे व्रत गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी होते. महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत पाळल्यास व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. ऋषीपंचमीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे.

गंगा स्नान केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूजनीय समजल्या जाणाऱ्या सप्तऋषींचे आशीर्वाद प्राप्त होतात. ऋषी पंचमी कधी आहे, त्याचा शुभ काळ आणि महत्त्व जाणून घेऊया.

Rishi Panchami 2024
Ganesh Chaturthi 2024: गणरायाच्या स्वागताची लगबग : कापडाची माळ, आर्टिफिशियल फ्लॉवरला मोठी मागणी

 

ऋषी पंचमी २०२४ तिथी

८ सप्टेंबर २०२४ रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाणार आहे. शुक्ल पक्षातील पंचमी ७ सप्टेंबर रोजी सायं.५ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होणार आहे. ती ८ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

ऋषीपंचमीला महिलांनी गंगेत स्नान केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. या दिवशी ऋषी मुनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, अत्रि, गौतम आणि भारद्वाज ऋषी यांची पूजा केली जाते.

 

Rishi Panchami 2024
Kokan Ganeshotsav: गणेश चतुर्थीआधीच बाप्पाच्या आगमनाची परंपरा माहिती आहे?

ऋषी पंचमी 2024 मुहूर्त

सप्त ऋषींच्या पूजेची वेळ - सकाळी ११.३ ते दुपारी ०१.३४

महिलांसाठी का आहे खास

ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये अशी आख्यायिका आहे. आजही ग्रामीण भागात शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्लेच जात नाहीत. अशी प्रथा आहे.

म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आता या सर्व भाज्या शहरांमध्येही बाजारात उपलब्ध असतात. शहरांमध्ये काही भागात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते या भाज्या विकायला घेऊन येतात.

Rishi Panchami 2024
गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी

ऋषी पंचमीसाठीचा मंत्र कोणता आहे?

कश्यपोतीर्थरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:.

जमदगनिनिर्वशेषाचा सप्तैते ऋष्य: स्मृती:  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.