Sangli Ganeshotsav : सांगलीत DJ च्या दणदणाटाने दोन तरुणांचा मृत्यू; पोलिस यंत्रणेने कानात बोळे घातलेत का?

माणसाचं मरण इतकं स्वस्त झालंय का, असं रस्त्यावरचे अपघात पाहून नेहमीच वाटतं.
Ganpati Visarjan Miravnuk Sangli
Ganpati Visarjan Miravnuk Sangliesakal
Updated on
Summary

गणेशोत्सव हे महाराष्ट्राचं ‘आनंदपर्व’ आहे. अशावेळी या कुटुंबावर आलेलं विघ्न, त्यांनी कसं सावरायचं?

Ganpati Visarjan Miravnuk Sangli : माणसाचं मरण इतकं स्वस्त झालंय का, असं रस्त्यावरचे अपघात पाहून नेहमीच वाटतं. आता त्याहून विदारक, भयाण, संतापजनक प्रकरण आवाजाच्या राक्षसाच्या रुपाने पाहायला मिळाले. साऊंड सिस्टिमचा (Sound System) दणदणाट सहन न झाल्याने दोन तरुणांनी प्राण गमावला.

Ganpati Visarjan Miravnuk Sangli
धक्कादायक! गणपती विसर्जनावेळी DJ च्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू? मंडळांतील 'ईर्षा' ठरली मृत्यूचं कारण

महाकाय आवाजाने आधी भिंती कोसळत होत्या, आता दोन कुटुंबे कोसळली आहेत. हा आवाज यंत्रणेच्या कानात घुमत नसेल का? त्यांनी कसले बोळे कानात घातले आहेत? आवाज मोजायची यंत्रे; किंबहुना ती खेळणी कुठे लपवून ठेवली आहेत? ती वापरूच नयेत, यासाठी कुणाचा दबाव आहे का? असला तरी तो माणसांच्या जीवापेक्षा मोठा आहे का?

कोणताही सामान्य माणूस ‘त्या’ भिंतरुपी आवाज राक्षसाच्या समोर उभा राहिला तर त्याचे पाय थरथर कापतील, हृदय वेगाने धडधडू लागेल, चक्कर यायला लागेल, कंप सुटेल... त्यात थोडा कमकुवत रुग्ण असेल तर... त्याचे उदाहरण कवठेएकंद आणि दुधारी येथे घडले. कवठ्यात शेखर पावसे, तर दुधारीत प्रवीण शिरतोडे या तरुणाचा साऊंड सिस्टिमच्या दणदणाटाने बळी घेतला.

पुढे काय? प्रदूषण नियंत्रण कायदा थोडा बाजूला ठेवू. इथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहात का? कारण, प्रदूषणाचा कायदा केव्हाच बासनात गुंडाळून ठेवला आहे. नियम पायदळी तुडवणाऱ्या मंडळांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होण्याची अपेक्षाच नाही. कारण, नियम सांगतो आणि पोलिसांनी त्यांच्याकडे तक्रार करायला हवी. पोलिसांकडून ते होईल, अशी सूतराम शक्यता नाही.

Ganpati Visarjan Miravnuk Sangli
'हिंदुस्थान हे हिंदवी राज्यच आहे, म्हणूनच इतर धर्म इथं राहू शकले'; गणपती पंचायतन संस्थानच्या प्रमुखांचं वक्तव्य

सांगलीतील प्रसिद्ध डॉ. अशोक पुरोहित सांगतात, की ७० डिसिबल या मर्यादेपर्यंतच आवाज कान सहन करू शकतात. आवाजाची पातळी वर गेली की धोका वाढतो. प्रतिवर्षी गणपती उत्सव होऊन गेल्यानंतर त्यांच्याकडे कानाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या वाढते. काहींना कमी ऐकायला येऊ लागतं, तर काहींना ऐकायचं पूर्ण बंद झालेलं असतं. तंत्रज्ञान प्रगत झालंय, मात्र एका विशिष्ट मर्यादेपलीकडे शस्त्रक्रियाही अर्थहीन आहेत.’’

Ganpati Visarjan Miravnuk Sangli
Ganpati Visarjan Miravnuk : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दोन मंडळांत जोरदार हाणामारीसह दगडफेक, तिघे जखमी

डॉक्टर जे सांगताहेत, ते अनेकजण अनुभवत आहेत. तरीही, ज्याला मिरवणुकीत सहभागी व्हायचे आहे, त्याने किमान कानात कापसाचे भक्कम बोळे वापरावेत. पोलिसांनी ते आधीच घातलेले आहेत, हे वेगळे सांगायला नको. डॉक्टरांच्या मते, एकदा श्रवणशक्ती गेली तर पुन्हा ती मिळणे अशक्य असते. तरीही, गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीतील या कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाला कोणी थांबवण्याबाबत सजगता दाखवलेली नाही. कवठेएकंद, दुधारीतील दोन तरुणांच्या बळीनंतर तरी ते घडेल, अशी अपेक्षा करावी का?

गणेशोत्सव हे महाराष्ट्राचं ‘आनंदपर्व’ आहे. अशावेळी या कुटुंबावर आलेलं विघ्न, त्यांनी कसं सावरायचं? समाजासाठी हे लांच्छनास्पद नाही का? उद्या पुन्हा मिरज शहरात, जिल्ह्यात कर्णकर्कश आवाजात डीजे, ढोल, प्रखर रोषणाई, लेझर लाईट्स असतील. भूकंप यावा तशा भिंती हादरतील, तिथे हाडामांसाच्या माणसाचे काय, त्याच्या हृदयाचं काय अन् नाजूक कानाच्या पडद्यांचं काय? क्षणभराच्या नसत्या आनंदासाठी, ईर्षेसाठी हा घाट कशाला हवा?

Ganpati Visarjan Miravnuk Sangli
Deepak Kesarkar : स्वार्थ सिद्ध झाल्यास पालकमंत्रिपदाचा राजीनामा देईन; केसरकरांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला तो सामाजिक प्रबोधनासाठी... सुसंवादासाठी! आपण त्याला काय वळण देऊन बसलोय? सरकार या मंडळांपुढे हतबल आहे. ही काहींसाठी मतपेढी आहे. त्यामुळेच पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ हातावर हात धरून बसले आहे. मिरजेत कदाचित तेच होईल. आणखी किती बळी गेल्यावर हे थांबेल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.