Ganeshotsav 2023: ३२० वर्षांची परंपरा, २१ दिवस बसणारा खवळे गणपती; विसर्जनाच्या दिवशी होते पिंडदान; जाणून घ्या इतिहास

या गणपतीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे.
Khawale Ganpati
Khawale GanpatiSakal
Updated on

कोकण हे गणेशोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मोठ्या उत्साहामध्ये आणि दिमाखात इथं गणेशोत्सव साजरा केला जातो. चाकरमानी, शिक्षणासाठी दूर गेलेले विद्यार्थी गणेशोत्सवासाठी खास, वेळात वेळ काढून कोकणात येतातच. कोकणामधील विविध गणपतींना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभलेल्या आहेत. त्यातलात एक गणपती म्हणजे खवळे कुटुंबीयांचा गणपती.

सिंधुदुर्गातल्या खवळे कुटुंबीयांच्या या गणपतीला ३२० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. या गणपतीचा उत्सव या २१ दिवस साजरा केला जातो. यामध्ये गणपतीची तीन वेगळी रुपे साकारली जातात. विसर्जनाच्या दिवशी या गणपतीसमोरच खवळे कुटुंबीय आपल्या पूर्वजांना पिंडदान करतात. या गणपतीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे.

Khawale Ganpati
Ganeshotsav 2023: कृष्णातीरावरचा गणपती, एका दगडातली मूर्ती अन् मत्स्याकार मंदिर; गणेशोत्सवात 'इथे' जायलाच हवं!

काय आहे या खवळे कुटुंबीयांच्या गणपतीचा इतिहास?

देवगडपासून २ किलोमीटरवर असलेल्या गाबतमुमरी किंवा तारामुंबरी या गावामध्ये हे खवळे कुटुंब राहतं. या घराण्यात ३२० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.खवळे घराण्यातील शिवतांडेल हा सरदार कान्होजी आंग्रे यांच्या आरमारामध्ये होता. शिवतांडेल यांच्या लग्नाला ७ वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हतं.

एके दिवशी ते झोपेत असताना मालवण या मूळ गावातल्या नारायण मंदिरातल्या गणपतीने दृष्टांत दिला आणि आपली स्थापना कऱण्यास सांगितलं. १७०१ मध्ये या गणपतीची स्थापना करण्यात आली.

Khawale Ganpati
Ganeshotsav 2023: स्वारीवर गेलेल्या भोसल्यांना गणेशोत्सवात यायला जमलं नाही; पितृपक्षात बसवला गणपती; जाणून घ्या इतिहास...

या गणपतीची वैशिष्ट्ये कोणती?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारण अर्पण करून या मूर्तीचं काम सुरू होतं. ही मूर्ती पावणेसहा फूट उंचीची असते. ही मूर्ती बनवण्यासाठी जवळपास दीड टन माती वापरली जाते. ही मूर्ती खवळे कुटुंबातल्या व्यक्ती स्वतः तयार करतात. गणेश चतुर्थी दिवशी पांढरा चुना लावलेली, फक्त डोळे रंगवलेली मूर्ती असते, तिची पूजा केली जाते. साधारण पाचव्या दिवशी या मूर्तीचं रंगकाम पूर्ण होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()