Ganesh Visarjan 2023: गणपतीचं विसर्जन का करतात? पाण्यातच विसर्जन का करतात? मनातल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...

गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाची प्रथा महाभारत ग्रंथाच्या रचनेनंतर सुरू झाली आहे
contractor was appointed for the moving tank but not approved ganesh visarjan 2023 pune
contractor was appointed for the moving tank but not approved ganesh visarjan 2023 puneesakal
Updated on

देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. काही ठिकाणी ११ दिवस गणपती बसतात तर काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांनी गणपतीचं विसर्जन केलं जातं. पण गणपतीचं विसर्जन का करतात? विसर्जनाची प्रथा कशी सुरू झाली? असे प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत.

ही माहिती विविध स्त्रोतांकडून मिळवलेली आहे. यातली बहुतांश माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे. हिंदू धर्मात मूर्ती विसर्जनाची पद्धत फार पूर्वीपासून आहे.पण गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाची प्रथा महाभारत ग्रंथाच्या रचनेनंतर सुरू झाली आहे. संस्कृतमध्ये विसर्जन या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पण मूर्ती विसर्जनाच्या संदर्भात याचा अर्थ पूजा करण्यात आलेल्या मूर्तीला पाण्यामध्ये विलीन करणं असा होतो. हा या मूर्तीचा सन्मान मानला जातो.

contractor was appointed for the moving tank but not approved ganesh visarjan 2023 pune
Mumbai Ganpati Visarjan 2023 : अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी; मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय

कोणत्याही देवी-देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना पूजा करून त्या मूर्तीमध्ये वास करण्यासाठी ईश्वराला आवाहन केलं जातं. त्यानंतर पूजा अर्चना करून एका ठराविक कालावधीनंतर त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. याच्यामागचं कारण असं की, आपण ईश्वराला निर्माण करू शकत नाही आणि नष्टही करत नाही. ज्या मूर्तीची पूजा केली जाते, तेव्हा त्या मूर्तीला आध्यात्मिक दृष्ट्या ईश्वराच्या रुपातच पाहिलं जातं.

गणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि विसर्जनाबद्दलही धर्म ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या तेजाला शांत करण्यासाठी त्यांना पाण्यामध्ये सोडून स्नान घातलं जातं. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या प्रतिमेचं विसर्जन करण्याची प्रथा आहे.

धर्मग्रंथांनुसार, महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्याचा निर्णय घेतला. पण हे काम महर्षी व्यासांना जमणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी भगवान श्री गणेशांची आराधना केली आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांनी या ग्रंथाच्या रचनेमध्ये आपल्याला मदत करावी. गणपतीने या गोष्टीला संमती दिली आणि रात्रंदिवस लिखाणाचं काम सुरू झालं. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून जवळपास १० दिवस महर्षी व्यासांनी महाभारताची कथा सांगितली आणि ती गणपतीने लिहून काढली. महर्षी व्यास यांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि लिखाणाच्या कामाची सुरुवात केली. हे काम अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपलं.

contractor was appointed for the moving tank but not approved ganesh visarjan 2023 pune
Ganpati Visarjan : दीड दिवसांच्या गणरायाला भक्तीभावाने निरोप

पण कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की, खूप जास्त मेहनत केल्यामुळे गणपतीच्या शरीराचं तापमान वाढलेलं होतं. त्यामुळे गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी महर्षी व्यास गणपतीला घेऊन सरोवरापाशी गेले आणि त्यांना स्नान घातलं. तेव्हापासून गणपती विसर्जनाची पद्धत सुरू झाली.

दुसरं एक कारण असंही सांगितलं जातं की, पृथ्वीची प्रमुख पाच तत्वे आहेत, ज्यामध्ये पाणी या तत्त्वाचा अधिपती असं गणपतीचं वर्णन केलं जातं. त्यामुळे गणपतीला पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आढळतो की, सलग १० दिवस लिहित बसल्यामुळे गणपतीचं शरीर आखडलं होतं, त्यामुळे गणपतीचं आणखी एक नाव पार्थिव गणेशही पडलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()