No Cook Coconut Mawa Modak Recipe: हिंदू धर्मात गणेश चतुर्थाला खुप महत्व आहे. गणेशोत्सव फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आहे. देशभरात मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक बाप्पा घरी येणार म्हणून उत्साही असतात.
गणपती बाप्पाला आवडणारे मोदक अनेक प्रकारे बनवले जातात. तुम्ही गॅसचा वापर न करता नारळ आणि माव्यापासून चवदार मोदक तयार करू शकता. यंदा बाप्पासाठी नारळ-मावा मोदक बनवून अर्पण करू शकता. हा मोदक बनवणे अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.