Rasmalai Modak Recipe: गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांना गणरायाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे
देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. बाजारात सुंदर गणेश मूर्ती, मिठाई तसेच सजावटीच्या साहित्याने सजली आहे. गणेश चतुर्थीला अनेक घरांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. दहा दिवस चालणाऱ्या गणपती उत्सवात गणरायाला रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवले जाते.
गणरायाला मोदक प्रिय आहे. गणपतीला मोदक अर्पण करणे शुभ मानले जाते. तुम्ही रसमलाई,रसमलाई केक किंवा आइस्क्रिमचा आस्वाद घेतला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का रसमलाई मोदक देखील तयार करू शकता.
यंदा गणरायाला रसमलाई मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता. रसमलाई मोदक बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. तुम्ही कमी वेळेत हे मोदक तयार करू शकता. याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. रसमलाई मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे जाणून घेऊया.