Ganesh Chaturthi 2024 :मोदकासाठी तांदूळ दळायचे विसरले, तर चिंता करू नका, तांदूळ भिजवून करा उकडीचे मोदक

तांदूळ दळून आणून त्यापासून मोदक बनवण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने अगदी सहज घरच्या घरी हे मोदक बनवू शकता.
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 esakal
Updated on

Ganesh Chaturthi 2024 :

कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोकणात गणपतीची एक वेगळीच मजा असते. बाप्पाच्या नैवेद्याला अनेक प्रकारचे पदार्थ असतात. त्यातही एक पदार्थ म्हणजे तांदळाचे मोदक.

तांदळापासून बनवलेले पांढरे शुभ्र उकडीचे मोदक हे जगभर प्रसिद्ध झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता इकडे गव्हापासून मोदक बनवले जातात. पण गणपती बाप्पासाठी आता पांढऱ्या शुभ्र तांदळाचे मोदक बनवण्याची क्रेझ वाढली आहे. (Modak Recipe)

Ganesh Chaturthi 2024
Kaju Modak Recipe: गणपती बाप्पासाठी झटपट १० मिनिटात बनवा स्वादिष्ट काजू मोदक, पाहा रेसिपी व्हिडिओ

तांदळाच्या उकडी पासून मोदक बनवण्यासाठी दोन-तीन दिवस आधीच तयारी करावी लागते. तांदूळ भिजवून ते दळून आणावे लागतात. आणि पिठापासून उकड काढून त्याच्यापासून मोदक बनवले जातात. पण घाईगडबडीत तुम्ही तांदूळ दळून आणायचे विसरले असाल तर काळजी करू नका.

अखंड तांदळापासूनही मोदक बनवता येतात. त्यासाठी तुम्हाला साउथ इंडियन रेसिपी वापरावी लागणार आहे. दक्षिण भारतात तांदळापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यांचे नाष्टाचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. इडली, डोसा, उत्तप्पा बनवण्यासाठी तांदूळ भिजत घालावे लागतात. हीच ट्रिक आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी वापरणार आहोत.

Ganesh Chaturthi 2024
Modak Recipe: आला रे आला गणपती आला, लाडक्या बाप्पासाठी बनवा 'या' बिस्किटपासून स्वादिष्ट मोदक, खाल्ल्यानंतर प्रत्येक जण विचारेल रेसिपी

तांदूळ दळून आणून त्यापासून मोदक बनवण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने अगदी सहज घरच्या घरी हे मोदक बनवू शकता. ते कसे बनवायचे हे पाहुयात.

साहित्य

तांदूळ, तूप, वेलची पूड, सुंठ पूड, नारळ, गुळ, ड्रायफ्रूट्स

Ganesh Chaturthi 2024
Benefits Of Modak: बाप्पाला प्रिय असलेले मोदक खाल्यास राहाल निरोगी, फक्त जाणून घ्या योग्य वेळ अन् पद्धत

कृती

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन भिजत घाला. आठ तासांनी तांदळातील पाणी काढून जेवढे तांदूळ होतील तितकेच पाणी घालून ते बारीक वाटून घ्या.

आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये पाणी घाला. आता या कढईत एक जाळी ठेवून पाणी उकळायला ठेवा. दुसरीकडे एक भांडे घेऊन त्यामध्ये तूप आणि मीठ टाका आणि या भांड्यात आपण वाटून घेतलेली तांदळाची पेस्ट टाका.

Ganesh Chaturthi 2024
Rasmalai Modak Recipe: गणपती स्पेशल, लंबोदरासाठी १० मिनिटांत बनवा चवदार रसमलाई मोदक, पाहा व्हिडिओ

आता हे भांड कढईत ठेवून तांदळाचे मिश्रण ढवळत रहा. पाच ते दहा मिनिटांच्या वेळातच तुम्हाला या भांड्यातील पीठ घट्ट होत आहे असं दिसेल. पूर्ण घट्ट होईपर्यंत तुम्ही हे ढवळत रहा आणि शेवटी पाच मिनिटे वाफ काढून घ्या.

आता परातीला तूप लावून हे पीठ परातीत घेऊन चांगले मळून घ्या. सारणासाठी बारीक केलेला नारळ तुपावर परतून घ्या. यामध्ये बारीक किसलेला गूळ, ड्रायफूट्स, वेलची पूड, सुंठ पूड घाला.

आता हाताला तूप किंवा तेल लावून पिठाच्या गोळ्याची चांगली पातळ पारी बनवून घ्या. आता या पारीमध्ये सारण भरून त्याला पाकळ्या पाडून मोदक बनवून घ्या. मोदक तयार झाले की पुन्हा एक वाफ काढा. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तांदळाचे कोरडे पीठ नसतानाही मोदक बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.