Motichoor Modak: हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खुप महत्व आहे. या दिवशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केलं जाते. यंदा १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.
बाप्पाला मोदक, लाल फुल आणि दुर्वा प्रिय आहे. गणरायाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.
आज बाप्पाच्या आगमनाला नऊ दिवस पुर्ण झाले आहे. पण अनेक ठिकाणी दिड दिवस तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
तुम्हाला बाप्पासाठी मोतीचुर मोदक बनवायचे असेल तर पुढील सोप्या पद्धतीने बनवू शकता. मोतीचुर मोदक बनवणे सोपे असून चवदार आहेत. चला तर मग जाणून घेऊया मोतीचुर मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे.
बेसण १ कप
बेकिंग सोडा
फुड कलर
पाणी
तेल
साखर
वेलची पावडर
भोपळ्याच्या बिया
मोतीचुर लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बेसण, बेकिंग सोडा, फुल कलर आणि पाणी घालून चांगले मिक्स करावे.
नंतर या मिश्रणाचे छोटे गोळे तळून घ्यावे
नंतर थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारिक करून घ्यावे.
एका भांडयात पाणी आणि साखर टाकून पात तयार करावा.
त्यात लाल फुल कलर आणि वेलची पावडर टाका
नंतर त्यात बेसणाचे सारण मिक्स करावे.
नंतर भोपळा बिया घालून चांगले मिकस् करावे.
सारण घट्ट झाल्यानंतर मोदकाचा साचा वापरून मोदक तयार करून घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.