High Protein Apricot Stuffed Modak: आज गणपती बाप्पाच्या आगमनला पाच दिवस पुर्ण झाले आहेत. सर्व ठिकाणी मंगलमय, उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. गणेश मंडळांची सजावट पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवात सकाळ-संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते. लंबोदराला मोदक, लाल फुल आणि दुर्वा खुप प्रिय आहे. या गोष्टी अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.
बाप्पाला रोज वेगवेगळ्या चवीचे स्वादिष्ट मोदक अर्पण करू शकता. आज बाप्पासाठी स्टफ जर्दाळू मोदक तयार करू शकता. हे मोदक बनवणे खुप सोपे आहे. स्टफ जर्दाळू मोदक कमी वेळेत तयार होतात. घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हे मोदक आवडेल. हे मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.