डॉ. प्रणिता अशोक, आहारतज्ज्ञ
ग णपती बाप्पा आणि गौरीसाठी केल्या जाणाऱ्या प्रसादाचे असंख्य प्रकार त्या-त्या भागानुसार केले जातात. कोकणातील प्रसादात जसे वैविध्य असते, तसे मराठवाडा-विदर्भात. पश्चिम महाराष्ट्रातील पदार्थांमध्ये आणि त्यांच्या चवीत आणखी फरक असतो. पण मोदक, लाह्या यासारख्या खिरापतीसोबत काही पदार्थ हे सगळीकडे असतातच. त्यातलाच एक बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लाडू.
लाडूचा नैवेद्य जसा गणपतीला दाखवला जातो तसाच गौरी समोर जे फराळाचे विविध प्रकार ठेवले जातात त्यात लाडू हमखास असतात. आजकाल आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे त्यामुळे कमी गोड किंवा हेल्दी लाडू खाण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे नैवेद्यासाठी आपण कोणते लाडू करू शकतो आणि त्याचे आहारशास्त्राच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत हे पाहूयात.