न्यूयॉर्क : जागतिक हवामान बदल आणि प्रदूषणामुळे जगभरातील सुमारे १ अब्ज मुलांसमोर नैसर्गिक संकटे आ वासून उभी ठाकली असल्याचे यूनिसेफच्या ताज्या अहवालातून उघड झाले आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांच्या अनुषंगाने भारताचा उच्च जोखीम असलेल्या देशांच्या श्रेणीत समावेश होतो. भारतासह ३३ देशांतील कोट्यावधी मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षिततेवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. एवढेच नाही तर या देशांतील मुले एकाचवेळी तीन ते चार नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहेत. या संकटांमध्ये उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळ, दुष्काळ, पूर आणि हवेचे प्रदूषण यांचा समावेश आहे. (International News)
परिणाम अधिक गंभीर
निक रिस म्हणाले की, जगभरातील मुले हे हवामान बदलाच्या संकटात सापडत असून हे सगळे आमच्यासाठी अनाकलनीय आहे. यावर आपल्याला लवकर तोडगा काढावा लागेल. हवामान बदलाच्या संकटाचा प्रभाव हा खोल परिणाम करणारा आहे. आगामी काळात हा परिणाम आणखी तीव्र होऊ शकतो. रिस यांच्या मते, जगातील दहा देशांचा समावेश उच्च जोखमीच्या श्रेणीत होतो, हे देश ०.५ टक्के एवढ्या कार्बन उत्सर्जनास जबाबदार आहेत.
३० कोटी मुलांना प्रदूषणाचा धोका
युनिसेफच्या अहवालात ( The Climate Crisis Is a Child Rights Crisis: Introducing the Children’s Climate Risk Index’) यात म्हटले की, जगभरातील ९२ कोटी मुलांना स्वच्छ पाणी मिळत नाही, ८२ कोटी मुलांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे तर ६० कोटी मुले हे मलेरिया, डेंगी यासारख्या आजारांचा सामना करत आहेत. यानुसार जगभरात सुमारे ३० कोटी मुले ही उच्च प्रदूषणास सामोरे जातात कोळशाच्या खाणी, विटभट्ट्या, फूटपाथ, कारखाने आदी ठिकाणी प्रदूषणाची तीव्रता अधिक आहे.
यूनिसेफकडून शिफारस
पर्यावरणपूरक घटकांत गुंतवणूक वाढवणे ,कार्बन उत्सर्जनास आळा घालणे
दुष्परिणाम रोखण्यासाठी हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करणे
हवामान बदलासंबंधीचे शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देणे
कोविडशी मुकाबला करताना पर्यावरण पूरक उपक्रमांना प्राधान्य देणे
या आधारे मूल्यमापन
जगभरातील मुलांची स्थिती चिंताजनक असल्याचे ‘युनिसेफ’ने म्हटले आहे. हवामान बदलामुळे येणारे अस्मानी संकट, प्रदूषणाचा परिणाम तसेच गरीब जनता आणि मुलांना स्वच्छ पाण्याची उपलब्धता तसेच आरोग्य व शिक्षणाची सोय या घटकांना समोर ठेवून युनिसेफने अहवाल तयार केला आहे.
पर्यावरणावरील संकट हे बाल हक्कांवरील मोठे संकट आहे. जगातील सुमारे १ अब्ज मुले नैसर्गिक आपत्तीच्या अति जोखमीच्या देशांत राहतात. आता क्लायमेट ॲक्शनची वेळ आली आहे. हातावर हात ठेवून बसण्याची ही वेळ नाही.
- ॲन्टोनिओ गुंटेरेस, सरचिटणीस, युनो
हवामान बदल आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे बालपण संकटात आले आहे. नैसर्गिक संकटामुळे मुलांना हवी असणारी स्वच्छ हवा, सकस भोजन, शिक्षण, राहणीमान, शोषणमुक्ती आणि एवढेच नाही तर त्यांच्या जिवंत राहण्याच्या हक्कांवरही टांगती तलवार आहे.
- हेन्रीएटा फोर, कार्यकारी संचालक
असेही संकट
२४ कोटी
मुलांना पुराचा धोका
४० कोटी
मुलांवर चक्रीवादळाचे संकट
८२ कोटी
मुलांना उष्णतेच्या लाटेचा धोका
९२ कोटी
मुलांना पाणीटंचाईचा फटका
८५ कोटी
मुले किमान चार प्रकारच्या नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहेत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.