लग्नाची हौस तरी किती, अकरा पती झाल्यानंतर बाराव्याचा सुरुय शोध

बाराव्या लग्नाची तयारी! अकरा लग्न न टिकण्याचे कारण काय?
12th finding partner for marriage
12th finding partner for marriage sakal
Updated on

ही महिला तिचं लग्नच टिकत नाही म्हणून खूप अस्वस्थ आहे. आपल लग्न टिकावं आपण देखील इतरांसारखा सुखानं संसार करावा, म्हणून तिने आतापर्यंत 11 वेळेस लग्न करुन पाहिले. पण अकरापैकी एकाही जोडीदारासोबत तिचे नातं जास्त काळ टिकलं नाही. असं असूनसुध्दा मनात एक सकारात्मक विचार ठेवून ती आता चांगला पती मिळावा म्हणून 12 वे लग्न करण्यासाठी ईच्छूक आहे. तिला आशा आहे की 12 वे लग्न करुन आतातरी आपल्याला चांगला जोडीदार भेटू शकेल.

12 वे लग्न करण्यासाठी तयार असणाऱ्या महिलेच नाव आहे मोनेट डियास. या 52 वर्षाच्या आहेत. त्या अमेरिकेतील ऊटा शहरात राहतात. डियासही पेशाने इंटीरियर डिजाइनर आहे. डियास या TLC च्या शो ‘Addicted to Marriage’ मध्ये सुध्दा येऊन गेल्या आहेत. डियास आपल्या बॉयफ्रेंड जॉन सोबत या शो मध्ये आल्या होत्या. या दोघांच्या नातं या शो मध्ये एकदम भारी दाखवलं गेल होतं.

त्यामुळे हा शो पाहून अस वाटतं होतं की या दोघांच नातं एकदम घट्ट आहे. पण वास्तवात त्या दोघांचे प्रचंड भांडणं सुरु होते. एक दिवस हे भांडण विकोपाला जाऊन त्यांचं नातं तुटलं. या दोघांच्या भांडणाच कारण होतं ते म्हणजे त्यांचं रिलेशनशिप आणि रिलेशनशिपचं भविष्य कसे असेल यावरून त्याच भांडण सुरु झालं होत.

शेवटी शोमध्ये डियास ने सांगितले होतं की , मी या ब्रेकअपमुळे प्रचंड दुःखी झाले आहे. कारण माझं जॉनवर खूप प्रेम होतं. पण जेव्हा भांडण झाले तेव्हा मला आमच्या नात्यातलं खरं वास्तव समजलं आणि त्यामुळे मी जो जॉनपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे.

डियास पुढे सांगते की , मला अजून एका गोष्टीमुळे जास्त दुःख होतं. ती म्हणजे की मी या नात्याकरता खूप कष्ट घेतले होते. माझा खूप वेळ मी या नात्यांवर खर्च केला होता. पण असं म्हणतात ना की आपण ज्या व्यक्तीवर जास्त प्रेम करतो, ज्या व्यक्तीवर आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो. तोच व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त वेदना, दुःख देतो. ते अगदी खरं आहे.

विचार करायला भाग पाडणारी गोष्ट अशी की,रिलेशनशिपमध्ये मिळालेल्या या अपयशानंतर सुध्दा डियासला अजूनही आशा वाटते. आपल्याला आयुष्यात अजून एखादा असा व्यक्ती येऊ शकतो जो आपल्यावर खरं प्रेम करेल. या जगात असा एक व्यक्ती नक्की आहे जो माझी वाट बघत असेल.

डियास पुढे सांगते की, जो आयुष्यात हार मानतो त्याला पुढे आयुष्य जगताना कुणीच किंमत देत नाही. त्यामुळे मी हार मानणार नाही. आता मी याच सकारात्मक आशेवर आहे की, माझं लग्न एका सुंदर व्यक्तीसोबत होणार आहे. तो व्यक्ती माझ्यावर खूप प्रेम करणारा असेल, आणि आम्ही दोघं मिळून सुखाचा संसार करू.

डियासाला एक बहिण सुध्दा आहे. जिच नाव मार्सी आहे. ती 38 वर्षांपासून आपला संसार सुखाने करत आहे. मार्सी म्हणते की, डियासचे जेव्हा दोनदा तिनदा लग्न झाले. तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं. पण आता जेव्हा 10 पेक्षा अधिक लग्न होऊनही तिला चांगला जोडीदार भेटला नाही त्यामुळे तिला चांगला जोडीदार आता भेटणे शक्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.