आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.
आफ्रिकेच्या सेनेगलमधील हॉस्पिटलमध्ये (Africian Nation Senegal) लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. या दुर्दैवी घटनेनंतर सेनेगलचे अध्यक्ष मॅकी सॅल (Macky Sall) यांनी बुधवारी रात्री उशिरा सांगितलं की, 'पश्चिम सेनेगल शहरातील तिवौनेमधील रुग्णालयात आगीमुळं 11 नवजात बालकांचा मृत्यू (Eleven newborn babies died) झालाय.' यादरम्यान, पश्चिम आफ्रिकन देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सेनेगलमध्ये मध्यरात्री अध्यक्ष मॅकी सॅल यांनी ट्विटरव्दारे जाहीर केलं की, आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाला असून मला नुकतीच सार्वजनिक रुग्णालयातील नवजात शिशु विभागात (Neonatal Department) लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. नवजात बालकांच्या मातांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो, असं त्यांनी नमूद केलंय.
सेनेगल नेते डिओप साय (Diop Sy) यांच्या म्हणण्यानुसार, 'आगीची दुर्घटना तिवौनेच्या ट्रान्सपोर्ट हबमधील मामे अब्दु अजीज दबाख हॉस्पिटलमध्ये घडलीय. ही आग शॉर्ट सर्किटमुळं घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयात आग लागल्यानंतर तीन अर्भकांना वाचवण्यात आलंय.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.