Gold Mine Land Slide: सोन्याच्या खाणीत भूस्खलन, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडके; आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू

Indonesia Landslide: मे महिन्यात इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर आणि चिखलामुळे 50 हून अधिक लोक मरण पावले होते.
Indonesia Gold Mine Land Slide
Indonesia Gold Mine Land SlideEsakal
Updated on

इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मुसळधार पावसामुळे अवैध सोन्याच्या खाणीत भूस्खलन झाले. भूस्खलनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण सध्या बेपत्ता आहेत.

स्थानिक बचाव पथक बसरनासचे प्रमुख हेरियंटो यांनी सांगितले की, रविवारी सकाळी गोरोंतालो प्रांतातील सुमावा जिल्ह्यात भूस्खलनात खाण कामगार आणि अवैध खाणीजवळ राहणारे रहिवासी ठार झाले. या दुर्घटनेत मातीखाली दबलेल्या पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, बचाव पथके सोमवारीही बेपत्ता 18 जणांचा शोध घेत आहेत.

हेरियंटो म्हणाले, "आम्ही बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय बचाव पथक, पोलीस आणि लष्करी जवानांसह 164 कर्मचारी तैनात केले आहेत."

भूस्खलनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बचाव कर्मचाऱ्यांना सुमारे 20 किलोमीटर अंतर कापावे लागते. येथे रस्त्यावरील चिखल आणि परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

ते म्हणाले की, शक्य असल्यास ते लोकांना वाचवण्यासाठी उत्खनन यंत्राचा वापर करतील. एजन्सीनुसार, भूस्खलनामुळे काही घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. इंडोनेशियाच्या आपत्ती एजन्सीने (बीएनपीबी) सांगितले की भूस्खलनामुळे अनेक घरे आणि एका पुलाचे नुकसान झाले आहे.

सोमवारी आणि मंगळवारी गोरोंतालो प्रांतातील काही भागात पाऊस पडू शकतो असा इशारा रहिवाशांनी दिला आणि लोकांना सतर्क राहण्यास सांगितले.

Indonesia Gold Mine Land Slide
France Election 2024: फ्रेंच निवडणुकीत त्रिशंकू संसदेची शक्यता, एक्झिट पोलमध्ये डावी आघाडी वरचढ

एप्रिलमध्ये दक्षिण सुलावेसी येथे झालेल्या भूस्खलनात 18 जणांचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसामुळे ही घटनाही घडली होती. त्याच वेळी, मे महिन्यात इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर आणि चिखलामुळे 50 हून अधिक लोक मरण पावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.