या सगळ्यानंतर आता एक वेगळी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाचं रुपांतर शेवटी युद्धात झालं. गुरुवारपासून युद्धाला सुरुवात झाली. युक्रेनमध्ये अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करण्यात आले. यामध्ये पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियानं निवासी इमरातींवर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. (Ukraine Russia crisis) युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये देखील रशियानं बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. राजधानीपासून काही अंतरावर मोठा स्फोट झाला आहे. या सगळ्यानंतर आता एक वेगळी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Ukraine Russia war update)
युक्रेनच्या एका बेटावरील १३ जवानांनी शरण येण्यास नकार दिल्याने रशियाने सर्वच्या सर्व १३ जणांना मारुन टाकले. मारण्यापूर्वी रशियन आणि युक्रेन सैनिकांच्यात झालेला संवाद देखील एका व्हिडिओमधून समोर आला आहे. यात रशियन सैनिक युक्रेनच्या जवानांना शरण या अन्यथा मारले जाल असा इशारा देतात. मात्र युक्रेनचे जवान कोणल्याही परिस्थितीमध्ये शरण येण्यास नकार देतात. यामुळे रशियाने सर्व १३ जणांचा जीव घेतला.
दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रनने इतर देशांना मदतीचं आवाहन केलं होतं. आतापर्यंत रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. या प्लांटमधील कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवण्यात आले होते. 1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं. आता ही अणुभट्टीवर रशियाच्या ताब्यात असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.