नवी दिल्ली : मेक्सिकोमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली असून नौदलाचं ब्लॅकहॉक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर कोसळल्यानं त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर उत्तरेकडील राज्य सिनालोआ इथं कोसळलं. पण यामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश स्थानिक सकारनं दिले आहेत. दरम्यान, सिनालोतील ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरो याच्या अटकेमुळेच हा घातपात घडवल्याचे काही धागेदोरे मिळाल्याचं नौदलानं शुक्रवारी सांगितलं. (14 dead in Black Hawk chopper crash in Mexico after drug lord arrest)
मेक्सिकोच्या नौदलानं शुक्रवारी राफेल क्वांटेरो या खतरनाक ड्रग्ज माफियाला अटक केली होती. राफेलनं सन १९८५ मध्ये अमेरिकेच्या अॅन्टी नार्कोटिक्स एजन्टचा छळ करुन हत्या केली होती. याच प्रकरणी त्याला शुक्रवारी मेक्सिकन पोलिसांनी अटक केली होती.
मेक्सिकन नौदलानं आपल्या निवेदनात म्हटलं की, राफेल कारो क्विंटेरोला मेक्सिकोच्या ड्रग्ज तस्करीचं केंद्र असलेल्या सिनालोआ राज्यातील चोईक्स नगरपालिकेच्या हद्दीत पकडण्यात आलं. तो लपून बसला होता, असंही नौदलानं सांगितलं. ही अटक अमेरिकेच्या दबावानंतर झाली होती, मेक्सिकन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार याच आठवड्यात मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतली.
मेक्सिकोच्या रक्तरंजित ड्रग्ज युद्धांमधील सर्वात कुख्यात हत्यांपैकी एक माजी अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन (DEA) एजंट 'एनरिक किकी कॅमरेना' यांची निर्घृण हत्या होय. यासाठी क्विंटरोने 28 वर्षे तुरुंगात घालवली. 2018च्या नेटफ्लिक्स मालिकेतील "नार्कोस: मेक्सिको" मध्ये त्याचा पाच दशकांच्या नाट्यमय प्रवास दाखवण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.