PM Modi in US : अमेरिकेच्या संसदेत पंतप्रधानांनी केलं भाषण; १५ वेळा उभे राहिले खासदार, ७९ वेळा वाजल्या टाळ्या

संयुक्त सत्रातील भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसमधील कित्येक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
PM Modi in US Congress
PM Modi in US CongresseSakal
Updated on

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेतील संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, दहशतवाद, अमेरिका आणि मुंबईमधील दहशतवादी हल्ले अशा विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी अमेरिकेच्या खासदारांनी तब्बल ७९ वेळा टाळ्या वाजवून मोदींना प्रतिसाद दिला.

पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी कमीत कमी १५ वेळा अमेरिकेतील खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. तर, मोदींच्या एकूण भाषणादरम्यान एकूण ७९ वेळा टाळ्या वाजल्या. पंतप्रधान मोदींचे भाषण संपल्यानंतरही बराच वेळ अमेरिकेतील खासदार उभं राहून टाळ्या वाजवत होते.

PM Modi in US Congress
PM Modi US Visit : ‘तंत्रज्ञानदशक’ बनविण्याचे उद्दिष्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सेल्फीसाठी झाली गर्दी

संयुक्त सत्रातील भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसमधील कित्येक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसंच त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी, आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही गर्दी झाली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष केविन मॅक्कार्थी यांच्या संयुक्त सत्र संबोधन पुस्तिकेवर देखील सही केली.

काय म्हणाले मोदी

पंतप्रधान मोदी सुमारे तासभर या सभेला संबोधित करत होते. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवाद आणि कट्टरपंथ जगासाठी मोठा धोका बनत चालल्याचा उल्लेख केला. अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे, तर भारत सगळ्यात मोठी. त्यामुळे या दोन्ही देशांची भागिदारी लोकशाहीच्या भविष्यासाठी अगदी चांगली बाब असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानलाही नाव न घेता चांगलंच सुनावलं.

पंतप्रधानांचं भाषण उत्साहवर्धक

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धाबाबतही भाष्य केलं. रक्तपात थांबवून, युद्धावर चर्चेतून तोडगा काढण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधानांचं हे भाषण अगदी उत्साहवर्धक असल्याचं मत अमेरिकेतील काँग्रेस सदस्य डॅन म्यूजर यांनी व्यक्त केलं.

PM Modi in US Congress
PM Modi US Visit : महासत्तेशी ‘पॉवरफुल’ भागीदारी; जेट इंजिनाची निर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये करारांची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.