150 भारतीयांचं अपहरण केलं नाही - तालिबानचे स्पष्टीकरण

150 भारतीयांचं अपहरण केलं नाही - तालिबानचे स्पष्टीकरण
Updated on

afghanistan crisis : काबुल विमानतळावरुन 150 भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. यावर तालिबान्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही भारतीय नागरिकांचं अपहरण केलं नाही, असं स्पष्टीकरण तालिबान्यांनी केलं आहे. 150 भारतीयांना आम्ही काबुल विमानतळाच्या बाहेरुन उत्तर गेटमधून आतमध्ये नेलं आहे. भारतीय नागरिक सुरिक्षित आहेत, असं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे. तालिबानचे प्रवक्ता Ahmadullah Waseq यांनी भारतीय नागरिकांचं अपहरण केलं नसल्याचं सांगितलं.

विमानतळावरील हँगर्समध्ये भारतीय सुरक्षित आहेत. पासपोर्ट तपासणीसाठी भारतीयांना नेहण्यात आल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर तेथे अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. काबुल विमानतळाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

150 भारतीयांचं अपहरण केलं नाही - तालिबानचे स्पष्टीकरण
तालिबानची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत, मुनव्वर राणांविरोधात गुन्हा

तालिबानवर कोणताही विश्वास ठेवू शकत नाही, तिथे अनेक भारतीय व्यवसायासाठी गेलेले आहेत. त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी अपहरण केलेलं असू शकते, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहाता भारतीय सरकारला मोठी पावले उचलावी लागतील, कारण अपहरणाच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालिबान्यांकडे पैसे कमवण्यासाठी दुसरा मार्ग दिसत नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

150 भारतीयांचं अपहरण केलं नाही - तालिबानचे स्पष्टीकरण
बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? - भाजप

भारत सरकारसध्या अॅक्शनमोडमध्ये आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता IAF C-130J या विमानाने 85 भारतीय रवाना झाले. उर्वरित भारतीय काबुल विमानतळावर प्रतिक्षा करत होते. यावेळी त्यांचं अपहरण झाल्याचं वृत्त आहे. यावेळी तालिबान्यांकडून त्यांना मारहाणही झाल्याची माहिती आहे. जवळपास 250 भारतीय अद्यापही अफगाणिस्तानमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.