Sudan : जमिनीच्या वादातून संघर्ष पेटला; हिंसाचारात लहान मुलं, महिलांसह 170 जणांचा मृत्यू

सुदानच्या दक्षिणेकडील ब्लू नाईल राज्यात जातीय संघर्ष उफाळला आहे.
Sudan Land Dispute
Sudan Land Disputeesakal
Updated on
Summary

सुदानच्या दक्षिणेकडील ब्लू नाईल राज्यात जातीय संघर्ष उफाळला आहे.

कैरो : सुदानच्या दक्षिणेकडील ब्लू नाईल (Sudan Blue Nile) राज्यात जमिनीच्या वादावरून जातीय संघर्ष उफाळला आहे. या वादात आतापर्यंत 170 लोकांचा मृत्यू झालाय. दोन आदिवासी जमातींमध्ये (Tribal Community) मोठी हाणामारी झालीय. सुदानमधील ही हिंसक घटना अलीकडच्या काही महिन्यांतील सर्वात भीषण घटना आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्लू नाईल राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जमिनीच्या वादानंतर हौसा लोक आणि प्रतिस्पर्धी गटांच्या सदस्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. राजधानी खार्तूमच्या दक्षिणेस सुमारे 500 किलोमीटर अंतरावर रोझरेसजवळील वाड अल-माही परिसरात ही लढाई झाली.

Sudan Land Dispute
Indurikar Maharaj : 'तीनं' हृदय तोडलं म्हणून प्रेयसीसाठी जीव देऊ नका; असं का म्हणाले इंदुरीकर महाराज?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार ते गुरुवार या कालावधीत महिला, लहान मुलं आणि वृद्धांसह एकूण 170 जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी वाड अल-माही भागातील रहिवाशांनी घरांत घुसून जोरदार गोळीबार आणि आग लागल्याची माहिती दिली. या संघर्षात मृत्यू पावलेल्यांना न्याय मिळावा या मागणीसह संपूर्ण सुदानमध्ये संतप्त निदर्शनं सुरू झाली आहेत. या प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांनी जुलै अखेरपर्यंत शत्रुत्व संपवण्याचं मान्य केलं होतं. मात्र, असं असतानाही सप्टेंबरमध्ये पुन्हा मारामारीच्या घटना समोर येत आहेत.

Sudan Land Dispute
लिझ यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण? ऋषी सुनक यांच्या समोर 'या' 4 दिग्गजांचं आव्हान!

गेल्या आठवड्यात 13 जणांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयानं सांगितलं की, गेल्या आठवड्यात याच प्रदेशात जमिनीच्या वादावरून झालेल्या संघर्षात किमान 13 लोक मारले गेले. तर, 24 जखमी झाले. हिंसाचार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी या भागात रात्रभर संचारबंदी लागू केलीय. OCHA नं दिलेल्या माहितीनुसार, हौसा लोक आणि इतर गटांमध्ये पहिल्यांदा जुलैमध्ये संघर्ष सुरू झाला. ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत एकूण 149 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 124 जखमी झाले. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रानं सांगितलं की, या भागातील हिंसाचारामुळं सुमारे 65,000 लोकांना घरं सोडावी लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.