Nobel Prize 2019 : कॉस्मॉलॉजीतील संशोधनासाठी तिघांना नोबेल पुरस्कार जाहीर!

Nobel-2019-Physics
Nobel-2019-Physics
Updated on

स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी (ता.8) कॅनेडियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, स्विस शास्त्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना भौतिकशास्त्रातील 2019चे नोबेल पुरस्कार जाहीर केले.

स्टॉकहोम येथे मंगळवारी झालेल्या आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जेम्स पीबल्सला 'भौतिक विश्वविज्ञानातील सैद्धांतिक अन्वेषण'साठी अर्धे पारितोषिक देण्यात येणार असून उरलेले अर्धे पारितोषिक 'सौर-प्रकारातील ताऱ्याभोवती फिरणार्‍या एक्सोप्लानेटचा शोध' लावणाऱ्या मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना संयुक्तरित्या देण्यात येणार आहे.

1995मध्ये खगोलशास्त्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोज यांनी सौर मंडळाच्या बाहेरील 51-पेगासी या ग्रहाभोवती फिरणार्‍या पहिल्या एक्झोप्लानेटचा शोध लावला. या संशोधनानंतर या दोन्ही शास्त्रज्ञांनी ''केवळ असाधारण'' अशी प्रतिक्रिया नोंदविली होती.

2019 चे नोबेल पारितोषिक 'विश्वाची उत्क्रांती आणि विश्वातील पृथ्वीच्या स्थानाबद्दलचे समज सुधारण्यासाठी केलेलं संशोधन आणि आपल्या सौरमंडळाबाहेरील सौरताऱ्याभोवती फिरणाऱ्या एखाद्या ग्रहाचा पहिल्यांदा शोध लावल्याबद्दल देण्यात आले. या दोन्ही शोधांमुळे जगाच्या संकल्पना कायमचे बदलल्या," असे नोबेल अ‍ॅकॅडमीने म्हटले आहे. 

समितीच्या म्हणण्यानुसार, पीबल्सने एक सैद्धांतिक चौकट विकसित केली, ज्यामुळे विश्वाच्या उत्क्रांतीबद्दलच्या समजुती अधिक स्पष्ट होऊ शकल्या. त्याच्या मॉडेल्सवरून असे दिसून आले आहे की, विश्वाच्या फक्त 5% भागाची आपणास माहिती आहे, उर्वरित 95% भाग हा अज्ञात पोकळीसारखा आहे, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मेयर आणि क्वेलोझ यांनी 1995 मध्ये सौर मंडळाच्या बाहेरील एका अज्ञात ग्रहाचा शोध लावला होता. पहिल्यांदाच याविषयावर संशोधन झाले होते. 51 पेगासी असे या ग्रहाला नाव देण्यात आले असून हा एक वायूचा गुरु ग्रहासारखा दिसणारा वर्तुळाकार ग्रह आहे. या शोधानंतर खगोलशास्त्रात एक क्रांती सुरू केली.

मेयर हे स्वित्झर्लंडमधील असून ते जिनिव्हा विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात. तर क्वेलोज हेदेखील जिनिव्हा आणि केंब्रिज विद्यापीठात अध्यापनाचे काम करत आहेत. तर जेम्स पीबल्स हे प्रिन्सटन विद्यापीठात प्रोफेसर आहेत.

तरुणांनी विज्ञान क्षेत्रात यावे ​: पीबल्स
"तरुणांनी विज्ञान क्षेत्रात येऊन संशोधन करावे, असा सल्ला मी यानिमित्ताने देतो, असे जेम्स पीबल्स यांनी मंगळवारी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर म्हटले आहे.

9 दशलक्ष स्वीडिश क्रोना एवढी पारितोषिक रक्कम पुरस्कार विजेत्यांना देण्यात येणार आहे. या रकमेतील अर्धा वाटा पीबल्स यांना तर उरलेली रक्कम मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना देण्यात येणार आहे. विजेत्यांना सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देखील देण्यात येणार आहे.

काल अमेरिका आणि ब्रिटनच्या तीन संशोधकांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आले आहेत.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()