Apple Scammed : अॅपलसारख्या मोठ्या कंपनीला फसवायचा विचार कधी कोणी स्वप्नात सुद्धा करु शकणार नाही. परंतु काही दिवसांपूर्वी चीनमधील तीन भावांनी मिळून हा कारनामा केला आहे. जीवेई एलन लियाओ या व्यक्तीने अॅपल कंपनीला १ किंवा २ नव्हे तर तब्बल ५० कोटींचा चुना लावला. या कामात त्याने आपल्या दोन भावांची सुद्धा मदत घेतली.
आयफोन, आयपॅडच नव्हे तर अॅपलच्या कोणत्याही प्रॉडक्टची नकली कॉपी सध्या बाजारात उपलब्ध आहे. या तीन भावांनी याच गोष्टीचा फायदा घेत कोट्यवधी रुपयांचा स्कॅम करण्याचा प्लॅन आखला. या भावांनी मोठ्या चलाखीने तब्बल 10 हजार नकली आयफोन आणि 10 हजार नकली आयपॅडचं रुपातंर खऱ्या वाटणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये केलं.
कोणतीही मोबाईल कंपनी आपल्या प्रत्येक हँडसेटसाठी आयएमईआय नंबर सेट करते किंवा वेगळा सिरियल नंबर बनवते. अॅपलही आपल्या प्रॉडक्ट्सना असाच युनिक IMEI नंबर देते. युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये जे आयफोन आणि आयपॅड विकले गेले होते, त्यांचे सिरियल आणि आयएमईआय नंबरची माहिती या भावांनी काढली.
यानंतर त्यांनी चीनमध्ये बिनबोभाटपणे विकले जाणारे नकली आयफोन आणि आयपॅड्स मागवले. खऱ्या आयफोनचे चोरलेले IMEI नंबर त्यांनी चीनमधील नकली आयफोन आणि आयपॅडमध्ये सेट केले. अशा प्रकारे हे नकली आयफोन खऱ्यामध्ये रुपांतरित झाले.
त्यानंतर या तीन भावांनी ही नकली मॉडेल्स यूएस आणि कॅनडाला पाठवली आणि आयफोन घेऊन कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला जाण्यासाठी काही बेरोजगार मुलांना हायर केले.
अॅपल कंपनीची अशी पॉलिसी आहे, की एखादे प्रॉडक्ट खराब झाले तर कंपनी ते बदलून सुद्धा देते. ही मुलं आपले नकली आयफोन घेऊन सर्व्हिस सेंटरला जात होती, आणि त्या फोनमध्ये काही बिघाड झाला असल्याचं सांगून तो बदलून घेत होती.
अशा प्रकारे या तीन भावांकडे आपल्या नकली आयफोनच्या बदल्यात आता कंपनीचा नवा खरा आयफोन मिळत होता. या नव्या आयफोन मॉडेल्सना बाजारात नेऊन पुन्हा विकल जायचं. असं करत या तीन भावांनी मिळून अॅपल कंपनीला सुमारे ५० कोटींचा चुना लावला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.