Cambodia India Stuck: कंबोडियात 3,000 भारतीयांना गुलामासारखी वागणूक; न्यूड कॉलसाठी महिलांना भाग पाडलं जातंय

कंबोडियात अडकून पडलेले 3,000 भारतीय लोकांपैकी बरेच जण हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे रहिवासी आहेत.
Cambodia Indian Slaves
Cambodia Indian SlaveseSakal
Updated on

हैदराबाद : कंबोडियामध्ये 3,000 भारतीय लोक हे गुलाम म्हणून अडकून पडले असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मानवी तस्करीद्वारे या भारतीयांना कंबोडियात आणण्यात आलं. पण आता यातील महिलांचा वापर हनी ट्रॅपसाठी केला जात असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. (3000 Indians stuck as slaves in cambodia women being forced to make nude call)

Cambodia Indian Slaves
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी मोठी घडामोड! फरार मिहीर शहाला अखेर अटक

यांपैकी पीडित असलेले तेलंगणाची मुंशी प्रकाश याचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक झालं आहे. हैदराबादमध्ये एका आयटी कंपनीत त्यांनी काम केलं आहे. परदेशात कामासाठी एका जॉब साईटवर रिझ्युमे अपडेट केला. त्यानुसार तो कंबोडियात गेला आणि अडकला.

Cambodia Indian Slaves
Worli Hit And Run Case: मिहीर शहाला कोणी मदत केली? निबंध घेऊन जावा लागणार का? 60 तासानंतर अटक झाल्यामुळे ठाकरेंचा संताप

तसंच मूळचा महबूबाबादच्या बयाराम मंडळाच्या रहिवासी असलेल्या या व्यक्तीनं आपला वेदनादायक अनुभव सांगितला, "कंबोडियातील विजय नावाच्या एका एजंटने मला कॉल करून ऑस्ट्रेलियात नोकरीची ऑफर दिली, त्यानं सांगितलं की मला ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी प्रवासाची माहिती हवी होती त्यानुसार त्यानं मला मलेशियासाठी तिकीटं दिली. त्यानंतर मला क्वालालंपूरहून, १२ मार्च रोजी नोम पेन्ह इथं नेण्यात आलं.

विजयच्या स्थानिक प्रतिनिधीनं माझ्याकडून ८५,००० रुपये किंमतीचे अमेरिकन डॉलर्स घेतले. त्यानंतर, चिनी नागरिकांनी माझा पासपोर्ट जप्त केला आणि मला क्रॉन्ग बावेत इथं नेलं. हे टॉवर असलेलं मोठं कंपाउंड आहे. मला इतर भारतीयांसोबत टॉवर सी मध्ये ठेवण्यात आलं होतं, आम्हाला तेलुगू आणि इतर भाषांमध्ये मुलींचे बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी दहा दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

Cambodia Indian Slaves
लाईमटाईमपासून दुर असणारी अंबानींची लाडकी बहिणदेखील कोट्याधिश; जाणून घ्या दिप्ती साळगावकरचे नेटवर्थ

त्यानंतर आठवडाभर अंधाऱ्या खोलीत ठेवून आमच्यावर अत्याचार केला. "जेव्हा मी आजारी पडलो, तेव्हा त्यांनी मला बाहेर काढलं पण मला फसवणूक हे काम सुरू ठेवण्यास भाग पाडलं. मी माझे अत्यंत क्लेशकारक अनुभव सांगतानाचा एक सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात यशस्वी झालो. मी तामिळनाडूमधील माझ्या बहिणीला ईमेल पाठवला, तिनं तिथल्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली," असं प्रकाश यांनी सांगितलं. ही बाब एजन्सींच्या निदर्शनास आल्यानंतर तिथल्या भारतीय दूतावास आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारच्या प्रयत्नांनी प्रकाशची सुटका करण्यात आली.

Cambodia Indian Slaves
Shweta Tiwari : म्हणून, श्वेताला राजा चौधरीपासून घटस्फोट घ्यायला लागली ९ वर्षं ; "मला माझ्या मुलीची..."

कंबोडियात नेमकं काय सुरुए?

प्रकाश यांनी सांगितलं की, यापूर्वी 16 एप्रिल रोजी कंबोडियन पोलिसांनी त्यांची तस्करांपासून सुटका केली होती. परंतू चीनी टोळीनं माझ्यावर लावलेल्या खोट्या आरोपाखाली मला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांना हे आरोप खोटे असल्याचं समजल्यानंतर, मला 5 जुलै रोजी दिल्लीला पाठवण्यात आलं. यावेळी प्रकाश यांच्यासोबत आणखी नऊ जणांची सुटका करण्यात आली.

कंबोडियात अडकून पडलेले 3,000 भारतीय लोकांपैकी बरेच जण हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे रहिवासी आहेत. त्यांना डांबून ठेवण्यात आलेल्या छावण्यांमधून काही मुलांचा समावेश आहे ज्यांना नग्न कॉल करण्यास भाग पाडलं जात आहे. प्रकाशनं नोकरीसाठी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मुंबई आणि दिल्लीतील लोकांच्या भेटी घेतल्या आणि या सर्वांनी त्याला परदेशात नोकरीच्या बहाण्यानं फसवलं. या कारवायांमधून चीनी टोळीला मिळणारा पैसा आधी क्रिप्टोकरन्सी नंतर यूएस डॉलर आणि शेवटी चिनी युआनमध्ये बदलला जातो, असंही प्रकाश यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.