3 हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेली सुवर्णनगरी सापडली; आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन

ancient Egypt
ancient Egypt
Updated on

कैरो- इजिप्तमध्ये दक्षिणेकडील लक्सर शहरामध्येच तीन हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सुवर्णनगरीचे अवशेष सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी संशोधकांनी राजा तुतानखामेन याच्या मुलाची कबर शोधून काढली होती, त्यापाठोपाठचे हे सर्वांत मोठे संशोधन मानले जात आहे. राष्ट्रीय पुरातत्त्व खात्याने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करत माहिती दिली आहे. संशोधकांना उत्खननामध्ये सापडलेल्या नगराचे नाव हे ॲटेन असे असून इजिप्तचा राजा अमेनहोतेप (तृतीय) याने हे शहर वसविल्याचे बोलले जाते. इजिप्तच्या प्राचीन राजघराण्यातील तो नववा राजा होता. या राजघराण्याने इसवीसनपूर्व १३९१ ते १३५३ या काळात इजिप्तवर राज्य केले होते. विशेष म्हणजे याच काळात इजिप्तमध्ये प्रशासकीय व्यवस्थेचा मोठा दबदबा निर्माण झाला होता तसेच औद्योगिकीकरणाला देखील चालना मिळाली होती. सध्याच्या लक्सर शहराच्या पश्‍चिम दिशेला या शहराचे अवशेष आढळून आले आहेत.

सर्वांत मोठे संशोधन

जॉन हापकिन्स विद्यापीठामध्ये काम करणारे इजिप्तॉलॉजीचे संशोधक बेट्सी ब्रायन म्हणाले की तुतानखामेनच्या कबरीनंतर हे देशातील सर्वांत मोठे संशोधन आहे. यामुळे अतिप्राचीन इजिप्तमधील लोकजीवन समजून घेण्यास मदत होईल. या प्राचीन शहराच्या अवशेषांमुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना मिळू शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे. कोरोनाचा जागतिक संसर्ग आणि दहशतवाद्यांच्या कारवाया यामुळे या भागामध्ये एक अस्थिरता निर्माण झाली होती. याचा फटका पर्यटनालाही बसला आहे.

याआधीही शोध

या संशोधनाची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर इजिप्तॉलॉजी हा ट्रेंड विशेष चर्चेत आला होता. अनेकांनी संशोधकांचे कौतुक केले आहे. यामुळे इजिप्तचा खरा इतिहास समजण्यासाठी आणखी मदत होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान अन्य देशांमधील असंख्य संशोधकांनी याआधीही या शहराचा शोध घेतला होता पण त्यांना ते शोधता आले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.