हैतीच्या राजधानीत मोठा हिंसाचार; मुलांसह 315 लोकांनी शाळेत घेतला आश्रय, 99 जणांचा मृत्यू

सित्ते सोलेनी इथं दोन गटांत मोठा हिंसाचार झाला आहे.
Haiti Violence
Haiti Violence esakal
Updated on
Summary

सित्ते सोलेनी इथं दोन गटांत मोठा हिंसाचार झाला आहे.

Haiti Violence : टोळीयुद्धादरम्यान शनिवारी हैतीच्या (Haiti Violence) राजधानीतील एका हायस्कूलमध्ये शेकडो मुलं आणि प्रौढांनी आश्रय घेतलाय. राजधानीजवळील दाट लोकवस्ती असलेल्या सित्ते सोलेनी इथं 7 जुलै रोजी दोन गटांत मोठा हिंसाचार झाला, त्यामुळं शेकडो मुलांनी हायस्कूलमध्ये आश्रय घेतल्याचं चित्र आहे.

किजीटो या धार्मिक समुदाय गटाचे समन्वयक फ्रान्सिस्को सेरिफिन (Francisco Serifin) यांनी सांगितलं की, हिंसाचारादरम्यान 315 लोकांनी सेंट लुईस डी गोन्झाग स्कूल (Saint Louis de Gonzaga School) इथं आश्रय घेतला असून डेल्मास जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त काइट सोलेल इथं राहत आहेत. असे काही लोक आहेत, ज्यांना गादीशिवाय आता जमिनीवर झोपावं लागतंय.

Haiti Violence
मी राजकारणात येण्यास उत्सुक होतो, पण नियतीनं मला..; सरन्यायाधीशांचं मोठं विधान

सेरिफिन पुढं म्हणाले, शाळेत आश्रय घेतलेली अनेक मुलं पालकांशिवाय आली आहेत. काही मुलं आपल्या वडिलांची आणि आईची माहिती देण्यासाठी रांगेत उभे होते. काही बेपत्ता आहेत, तर काही जणांना टोळीनं गावी जाण्यापासून रोखलंय. 16 वर्षीय जीन मिशेलेट म्हणाली, 'आम्हाला खूप मदतीची गरज आहे. युद्ध सुरू झालं त्या दिवशी मी घरीच होते. इथं मोठ्या प्रमाणात गोळीबार झालाय. एक गोळी माझ्या डोक्यालाही लागलीय. माझ्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. चकमकीत बरेच लोक मारले गेलेत. परिस्थिती खूपच बिकट आहे.'

Haiti Violence
Rajasthan : राज्यात बनावट नोटांविरोधात मोठी कारवाई, पोलिसांनी दीड कोटींच्या नोटा केल्या जप्त

संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी एजन्सींनी म्हटलंय की, 'सोलेल शहरात आतापर्यंत 99 लोक मारले गेले आहेत.' संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे प्रवक्ते जेरेमी लॉरेन्स (Jeremy Lawrence) म्हणाले, हिंसाचारात नागरिक आणि मुलांना लक्ष्य केलं जात असून हे खूपच धोकादायक आहे. काही टोळ्या लोकांना पाणी आणि अन्न पिण्यापासून देखील प्रतिबंधित करत आहेत, त्यामुळं कुपोषण वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.