इस्लामाबाद - पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात सलग दुसऱ्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. कुर्रम या आदिवासी जिल्ह्यात गुरुवारी बंदुकधाऱ्या दहशतवाद्यांनी प्रवासी वाहनांवर बेछूट गोळीबार केला. यात ३८ लोक ठार झाले तर २९ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.